
IPL 2025: आयपीएल 2025 च्या प्लेऑफसाठी मुंबई इंडियन्सचे दोन मोठे खेळाडू उपलब्ध नसतील. संघ अद्याप प्लेऑफसाठी पात्र ठरलेला नसला तरी, संघ टॉप 4 मध्ये पोहोचण्याची शक्यता खूप जास्त आहे. दरम्यान, राष्ट्रीय प्रतिबद्धतेमुळे विल जॅक्स (Will Jacks) आणि रायन रिकेलटन (Ryan Rickelton) आयपीएल 2025 (IPL 2025) च्या उर्वरित सामन्यात दिसण्याची शक्यता नाही. विल जॅक्स इंग्लंडच्या एकदिवसीय संघासोबत असेल, तर रायन रिकेलटन वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 च्या अंतिम सामन्यासाठी इंग्लंडला जाणार आहे.
विल जॅक्स आणि रायन रिकेलटन यांची जागा जॉनी बेअरस्टो आणि रिचर्ड ग्लीसन घेण्याची शक्यता आहे. मात्र, याबद्दल बोलणी सुरू आहे. मुंबई इंडियन्स या दोन्ही खेळाडूंशी चर्चा करत आहे. विल जॅक्स मुंबई इंडियन्सच्या शेवटच्या दोन ग्रुप स्टेज सामन्यांसाठी भारतात आला आहे. परंतु तो प्लेऑफसाठी उपलब्ध नसणार आहे.
रिकेल्टन आणि कॉर्बिन बॉश यांना 27 मे रोजी आयपीएल 2025 सोडण्यास सांगण्यात आले आहे. त्यांना वर्ल्ड कप फायनलची तयारी करायची आहे. इंग्लंडचा रिचर्ड ग्लीसन प्लेऑफसाठी मुंबई इंडियन्सचा भाग असू शकतो. गेल्या हंगामात त्याने चेन्नईकडून दोन सामने खेळले. एमआयचे दोन लीग सामने 21 मे (दिल्ली कॅपिटल्स) आणि 26 मे (पंजाब किंग्ज) रोजी होणार आहेत. या सामन्यांच्या निकालांवरून एमआयची प्लेऑफसाठी पात्रता निश्चित केली जाईल.