सूर्यकुमार यादव म्हणतो Virat Kohli नव्हे तर ‘हा’ खेळाडू आहे सर्वोत्कृष्ट कर्णधार, दिले ‘हे’ मोठे कारण
विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव (Photo Credit: PTI)

शिखर धवनच्या नेतृत्वातील मर्यादित षटकांचा संघ श्रीलंका दौर्‍यावर (Sri Lanka Tour) गेला आहे. या संघात स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवचीही (Suryakumar Yadav) निवड करण्यात आली असून आयपीएलमध्ये (IPL) रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात खेळणाऱ्या सूर्याने थोड्याच वेळात संपूर्ण जगात आपली ओळख निर्माण केली आहे. सूर्यकुमारच्या यशामध्ये रोहित शर्माचा मोठा हात आहे यात शंका नाही. रोहितने सूर्याला त्याच्या नेतृत्वात सतत खेळण्याची संधी दिली आहे. यामुळेच विराट कोहलीच्या नेतृत्वात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा सूर्यकुमार रोहितला आपला आवडता कर्णधार मानतो. नुकतंच इंग्लंडविरुद्ध मालिकेतून आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या सूर्यकुमारने रोहितच्या कर्णधारपनाबद्दल मोठे विधान केले आहे. (IND vs SL 2021: श्रीलंका दौऱ्यावर टीम इंडियाच्या या खेळाडूंवर असणार नजर, जबर कामगिरी केल्यास मिळू शकते टी-20 वर्ल्ड कपचे तिकीट)

मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कर्णधार रोहित शर्माचे कौतुक करताना सूर्या म्हणाला की “रोहित आपल्या कर्णधारपदी पूर्णपणे स्पष्ट आहे. कोणता गोलंदाजाला केव्हा चेंडू द्यायचा आहे किंवा कोणत्या खेळाडूला कुठे फिल्डिंगला ठेवायचे आहे रोहित हे काम उत्तम प्रकारे करतो. रोहित आयपीएलचा सर्वोत्कृष्ट कर्णधारही आहे. 8 वर्षात 5 शीर्षके ही एक मोठी उपलब्धी आहे.” 2020 मध्ये मुंबई आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात झालेल्या सामन्यात विराट कोहलीने एकदा सूर्यकुमार यादवला स्लेज केले होते. सामन्यादरम्यान सूर्यकुमार यादवने 43 चेंडूत 79 धावांची खेळी केली. त्या सामन्यात विराटने सूर्याला स्लेज करण्याचा प्रयत्न केला पण या युवा फलंदाजाने प्रत्येक वेळी कोहलीकडे दुर्लक्ष केले.

दरम्यान यादवला 2011 मध्ये मुंबई इंडियन्सने पहिल्यांदा खरेदी केले होते पण तेव्हा त्याला फक्त एक सामना खेळण्याची संधी मिळाली आणि नंतर यादव कोलकाता नाईट रायडर्समध्ये गेला जिथे त्याने आपल्या खालच्या फळीतील योगदानाने सर्वांना प्रभावित केले. त्यानंतर यादवला पुन्हा आयपीएल 2018 पूर्वी मुंबई इंडियन्सने विकत घेतले. मुंबई इथे त्याला आघाडीच्या फळीत बढती दिली आणि त्याने संधीच सोनं केलं. मुंबई इंडियन्स आणि घरगुती क्रिकेटमध्ये आकडेवारीच्या जोरावर सूर्यकुमारने राष्ट्रीय संघात स्थान मिळवले आहे आणि आतापर्यंत भारतासाठी केलेल्या दोन डावांमध्ये त्याने चमकदार कामगिरी केली आहे.