IPL 2023 पूर्वी मुंबई इंडियन्स ‘या’ 3 खेळाडूंना करेल रिलीज, आपल्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करतील
मुंबई इंडियन्स (Photo Credit: Instagram)

Mumbai Indians IPL 2022 : मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) आयपीएल (IPL) या मोसमातील सर्वात वाईट मोहीम ठरली. सलग आठ सामने गमावल्यानंतर पाचवेळा चॅम्पियन प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारी पहिली फ्रेंचायझी होती. मेगा लिलावापूर्वी (IPL Mega Auction) प्रत्येक विद्यमान फ्रँचायझीला फक्त चार खेळाडूंना रिटेन करण्याची परवानगी होती आणि त्यामुळे मुंबई पथकाची संपूर्ण रचना हादरली. मुंबईला अनेक प्रमुख खेळाडू रिलीज लागले आणि मर्यादित पर्समुळे लिलावात त्यांना पून्हा करंदी करू शकले नाही. आयपीएलच्या (IPL) सर्वात यशस्वी फ्रँचायझीं लिलावाची उत्तम रणनीतीसह उतरली नव्हती. पण आता आयपीएल 2023 लिलावापूर्वी (IPL Auction) प्रत्येक फ्रँचायझीला अमर्यादित खेळाडूंना रिटेन करण्याची परवानगी आहे. मात्र, या मोहिमेतील त्यांची निराशाजनक खेळी पाहता मुंबई काही खेळाडूंना बाहेर करण्याची शक्यता आहे. (IPL 2022: ‘या’ अनकॅप्ड धुरंधरांनी आपल्या कामगिरीने हंगामात आणली रंगत, येथे पहा संपूर्ण यादी)

1. टायमल मिल्स (Tymal Mills)

टायमल मिल्सचा मुंबई इंडियन्स सोबतचा हंगाम विशेष चांगला राहिला नाही. दुखापतीमुळे त्याला आयपीएल 2022 मधून बाहेर पडावे लागले. इंग्लिश वेगवान गोलंदाजाने या मोसमात पाच सामने खेळले, ज्यात सहा विकेट्स घेतल्या, जे खूप सभ्य कामगिरी आहे. इंग्लिश वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर पुढील हंगामात मुंबई संघात सामील होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे, पुढील वर्षाच्या लिलावापूर्वी मिल्स फ्रँचायझीद्वारे रिलीज केले जाऊ शकते.

2. फॅबियन ऍलन (Fabian Allen)

वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू फॅबियन ऍलनला खरेदी करण्याचा मुंबई इंडियन्सचा आणखी एक निर्णय फसला. स्पिनरला फक्त एक संधी मिळाली आणि त्याने एक विकेट घेतली व 11.50 च्या इकॉनॉमी रेटने 46 धावा लुटल्या. आयपीएल 2023 साठी ऍलनला कायम ठेवले तर हे नक्कीच आश्चर्यकारक ठरेल. पुढील लिलावात मुंबई नक्कीच दर्जेदार अष्टपैलू खेळाडूच्या शोधात असेल. तसेच किरोन पोलार्डचा हंगाम देखील सरासरीपेक्षा ठरल्याने, फ्रँचायझी निश्चितपणे भविष्यासाठी योजना आखण्याचा प्रयत्न करेल.

3. मयंक मार्कंडे (Mayank Markande)

मार्कंडे 2018 मध्ये मुंबई इंडियन्ससह यशस्वी हंगामानंतर प्रसिद्धीच्या झोतात आला. राजस्थान रॉयल्ससोबतच्या काही अघटित हंगामानंतर मयंकला पुन्हा एकदा मुंबईने मेगा ऑक्शनमध्ये विकत घेतले. या मोसमात या तरुणाने फक्त दोन सामने खेळले. मुरुगन अश्विन आणि हृतिक शोकीन यांना प्राधान्य दिल्याने लेग-स्पिनर जवळजवळ संपूर्ण हंगामात बेंचवर बसून राहिला. मुंबईच्या मयंक मार्कंडेच्या हाताळणीने स्पष्ट संकेत दिले की फिरकी गोलंदाज दीर्घकालीन योजनेचा भाग नाही. त्याऐवजी, मुंबई दर्जेदार आंतरराष्ट्रीय फिरकीपटू शोधण्याचा प्रयत्न करेल, जो मधल्या षटकांमध्ये संघासाठी सामना बदलू शकेल.