भारत क्रिकेटचा सामना हरला किंवा जिंकला. दोन्हीमध्ये चर्चा होते ती फक्त एका खेळाडूची. आता टीममध्ये नसला तरी त्याच्या सारखा कुणी नाही असं म्हणत संपूर्ण देश आठवण काढतो ते एका खेळाडूची तो म्हणजे एम एस धोनी (M S Dhoni). एम एसला आयुष्यात एकदा तरी मैदानावर खेळताना बघणं हे प्रत्येकासाठी स्वप्न. कॅप्टन कुलने सगळ्या प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी गडी मात्र मोठ्या जोशात आयपीएल खेळतो. फक्त धोनी (Mahendra Singh Dhoni) चेन्नई सुपर किंग्समध्ये (Chennai Super Kings) आहेत म्हणून लाखो चाहते चेन्नईला सपोर्ट करताना दिसतात. पण २०२३ च्या आयपीएल (IPL 2023) नंतर धोनी चेन्नई सुपर किंग्ससह आयपीएलला देखील रामराम ठोकणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे धोनीच्या चाहत्यांसाठी ही बॅड न्यूज (Bad News) असली तरी बीसीसीआय (BCCI) एक महत्वपूर्ण निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.
आयसीसीच्या (ICC Trophy) तिन ट्रॉफीचा मानकरी असलेला कर्णधर एम एस धोनीला (M S Dhoni) टी२० क्रिकेटबाबत (Cricket) महत्वाची जबाबदारी देण्याची चर्चा आहे. बीसीसीआय (BCCI) कडून याबाबत कुठलीही अधिकृत घोषणा केली नसली तरी एम एस कडे महत्वाची जबाबदारी सोपवली जाणार आहे. तरी धोनीच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. धोनीचा अनुभव, खेळण्याची शैली, कुल अन्ड काल्म नेचरचे लाखो चाहते आहे. भारतीय संघ धोनीच्या तालमित तयार झाल्यास तो संघासाठी आवश्यकचं ठरेल. (हे ही वाचा:- India Vs New Zealand: न्युझीलंड विरुध्द भारत सामान्याबाबत टीम न्यूझीलंडचा मोठा निर्णय, ‘या’ स्टार खेळाडू ऐवजी नव्या खेळाडूला संधी)
एम एस धोनीच्या रिटायरमेंटनंतर भारताने आजपर्यत आयसीसीची ट्रॉफी जिंकलेली नाही. धोनीकडे संघाची जबाबदारी असल्यास उत्तम प्रदर्शनासह लक फॅक्टर देखील भारतीय क्रिकेट संघाकडे चालून येईल अशी भारतीय चाहत्यांना अपेक्षा आहे. तरी बीसीसीआय काय निर्णय घेणार, त्या निर्णयावर एम एस धोनी काय प्रतिक्रीया देणार यावर सर्वांचं लक्ष लागलं आहे.