MS Dhoni Stats In IPL: आयपीएलच्या इतिहासात 'या' फलंदाजीत एमएस धोनी अव्वल स्थानावर, एका क्लिकवर घ्या वाचून
MS Dhoni (Photo Credit - Twitter)

IPL 2024: इंडियन प्रीमियर लीगच्या 17व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर (IPL 2024) करण्यात आले आहे. पहिल्या सामन्यात गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे संघ आमनेसामने (CSK vs RCB) असतील. दोन्ही संघांमधील हा सामना 22 मार्च रोजी चेन्नईच्या होम ग्राउंड एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. सध्या 21 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. सीएसके कर्णधार एमएस धोनीची (MD Dhoni) आयपीएल मधील सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये गणना केली जाते. एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने 5 वेळा ट्रॉफीवर कब्जा केला आहे. या काळात चाहत्यांना एमएस धोनीच्या फलंदाजीची चमकही पाहायला मिळाली. एमएस धोनी शेवटच्या षटकांमध्ये संघासाठी मॅच फिनिशरची भूमिका बजावताना दिसतो. आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत 150 हून अधिक डावांमध्ये फलंदाजी करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत एमएस धोनीच्या नावावर सर्वात कमी वेळा शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतण्याचा विक्रम आहे. या बाबतीत एमएस धोनी विराट कोहली आणि रोहित शर्मापेक्षा खूप पुढे आहे.

धोनी आयपीएलच्या इतिहासात केवळ 5 वेळा शून्यावर झाला बाद

महेंद्रसिंग धोनीने आयपीएलमध्ये आतापर्यंत 250 सामन्यांच्या 218 डावांमध्ये फलंदाजी केली आहे. या कालावधीत एमएस धोनीने 38.79 च्या सरासरीने 5082 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याचा स्ट्राइक रेट 135.92 आहे. एमएस धोनीने 24 अर्धशतकही झळकावले आहेत. तर 'कॅप्टन कूल' 87 वेळा नाबाद राहून पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. या काळात एमएस धोनी केवळ 5 डावात खाते न उघडता शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतला आहे.

किरॉन पोलार्डचे नाव दुसऱ्या क्रमांकावर

धोनीनंतर या यादीत मुंबई इंडियन्सचा माजी फलंदाज किरॉन पोलार्डचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. किरॉन पोलार्ड 171 डावात 5 वेळा खाते न उघडता बाद झाला. तर सीएसकेचे माजी फलंदाज सुरेश रैना आणि रॉबिन उथप्पा त्यांच्या आयपीएल कारकिर्दीत केवळ 8-8 वेळा शून्यावर आऊट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतले. (हे देखील वाचा: IPL 2024: प्रतीक्षा संपली! ऋषभ पंत दिल्लीच्या जर्सीमध्ये मैदानात परतला, सराव करताना फोटो व्हायरल)

रोहित-विराट किती वेळा शुन्यावर बाद

आयपीएलच्या इतिहासात शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतण्याच्या विराट कोहली आणि रोहित शर्माचे रेकॉर्ड बघितले तर दोघेही दुहेरी अंकात आहेत. रोहित शर्मा आतापर्यंत आयपीएलच्या 238 डावांमध्ये 16 वेळा शून्यावर बाद झाल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतला आहे, तर विराट कोहली आयपीएलमधील 229 डावांमध्ये खाते न उघडता 10 वेळा पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. या काळात रोहित शर्मा केवळ 28 वेळा नाबाद राहिला आहे. आयपीएलच्या इतिहासात विराट कोहली आतापर्यंत 34 वेळा नाबाद राहून पॅव्हेलियनमध्ये परतला आहे.

17वा हंगाम 22 मार्चपासून होणार सुरू 

22 मार्चपासून आयपीएलचा 17वा हंगाम सुरू होत आहे. चेपॉक येथील स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात पहिला सामना होणार आहे. आतापर्यंत, आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून, धोनीने 226 सामन्यांत 133 वेळा विजय मिळवला आहे, तर केवळ 91 सामने गमावले आहेत.