IPL 2019: चेन्नई सुपर किंग्स टीमच्या थीम सॉन्गवर थिरकले एमएस धोनी, हरभजन सिंग, केदार जाधव आणि मुरली विजय (Video)
Chennai Super Kings | (Photo Credits: Instagram)

इंडियन प्रीमियर लीग 2019 (IPL 2019) ला पुढच्या आठवड्यापासून सुरुवात होईल. त्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्सच्या (Chennai Super Kings) खेळाडूंचा जाहीरात शूटिंग दरम्यानचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यात त्यांचा डान्स आणि धमाल मस्ती पाहायला मिळत आहे. या व्हिडिओत चेन्नई सुपर किंग्सच्या थीम सॉन्गवर एमएस धोनी (MS Dhoni), हरभजन सिंग (Harbhajan Singh), केदार जाधव (Kedar Jadhav) आणि मुरली विजय (Murali Vijay) थिरकताना दिसत आहेत. हा व्हिडिओ चेन्नई सुपर किंग्सच्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.

आयपीएलसाठी एमएस धोनी, केदार जाधव शुक्रवारी (15 मार्च) संध्याकाळी तर हरभजन सिंग शनिवारी (16 मार्च) चेन्नईत दाखल झाला. सॉफ्ट ड्रिंकच्या जाहिरातीदरम्यान त्यांनी थीम सॉन्गवर डान्स केला. Game Banayega Name संकल्पनेवर IPL 12 चं खास थीम सॉंग, महेद्रसिंग धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा खास अंदाज (Video)

पहा व्हिडिओ:

 

View this post on Instagram

 

This song and the Men in Yellow, the best #Yellove story ever! #WhistlePodu 🦁💛 @thefrootilife

A post shared by Chennai Super Kings (@chennaiipl) on

23 मार्चपासून आयपीएलच्या 12 व्या सीजनला सुरुवात होत आहे. या सीजनमधील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात रंगणार आहे. या सामन्याच्या तिकीटांची विक्री 16 मार्चपासून सुरु झाली आहे.