MS Dhoni Birthday: हार्दिक पांड्या, सुरेश रैना, BCCI सह दिग्गजांनी अशा दिल्या एमएस धोनीला 39 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
एमएस धोनी आणि हार्दिक पांड्या (Photo Credit: Twitter)

7 जुलै रोजी भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) 39 वर्षांचा झाला. विश्व क्रिकेटमध्ये 'कॅप्टन कूल' म्हणून ओळखला जाणारा धोनी मागील एक वर्षापासून क्रिकेटपासून दूर आहे. त्याने आपला शेवटचा स्पर्धात्मक सामना म्हणजेच वर्ल्ड कप उपांत्य फेरीचा सामना न्यूझीलंडविरुद्ध मागील वर्षी जुलैमध्ये खेळला होता ज्यानंतर ब्रेकमुळे तो टीम इंडियापासून दूर आहे. धोनीचा जन्म 1981 मध्ये बिहारमध्ये (आताचा झारखंड) झाला होता. त्याने आपल्या क्रिकेट कारकीर्दीत अनेक विक्रमांची नोंद केली जे येणाऱ्या काळात खेळाडूंना मोडणे कठीण जाईल. रांची (Ranchi) येथे जन्मलेल्या या राजकुमारने आपल्या कारकीर्दीतील प्रत्येक गोष्ट साध्य केली आहे, जायचे स्वप्न जगातील प्रत्येक क्रिकेटर पाहतो. आजच्या दिवशी चाहतेच नाही तर जगातील सर्व मोठे क्रिकेटपटू धोनीला शुभेच्छा आणि आशीर्वाद देत आहेत. (Happy Birthday MS Dhoni: एमएस धोनी याला वाढदिवसानिमित्त डीजे ब्रावोकडून म्यूजिकल गिफ्ट, 'Helicopter 7' गाणं रिलीज Watch Video)

हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि सुरेश रैना यांनी 39 व्या वाढदिवशी धोनीला सोशल मीडियावरून शुभेच्छा देत खास पोस्ट शेअर केली. पहिले चेन्नई सुपर किंग्जने त्यांच्या कर्णधाराच्या वाढदिवशी एक विशेष व्हिडिओ पोस्ट केला. चेन्नईने सर्व सिनिअर आणि जुनिअर खेळाडूंचा एक व्हिडिओ तयार केला आहे, ज्यामध्ये ते धोनीला भविष्यासाठी शुभेच्छा देत आहेत.

"माझ्या एका आवडत्या ब्याकती, भावाला आणि ज्यांना मी कधी विचारू शकतो अशा नेत्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! जो माणूस नेहमी मनाने खेळला. त्याचे कर्णधारपद फक्त त्याच्या निर्णयांमुळेच यशस्वी झाले नाही तर त्यांच्या संघातील प्रत्येक सदस्यावर असलेल्या विश्वासामुळेही यशस्वी झाले आहे! तर आमच्या स्पेशल नंबर 7 वर, ज्याने जिंकण्याची सवय लावली. सर्व प्रेरणा दिल्याबद्दल धन्यवाद," रैनाने लिहिले.

“चिंटूकडून माझ्या बिट्टूला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, माझा मित्र, ज्याने मला एक चांगला माणूस होणे शिकवले आणि वाईट काळात माझी साथ दिली आहे,” हार्दिक पांड्याने लिहिले.

व्हीव्हीस लक्ष्मण

कुलदीप यादव

बीसीसीआय

वेदा कृष्णमूर्ती

प्रज्ञान ओझा

मोहम्मद कैफ

विराट कोहली

वीरेंद्र सेहवाग

कृणाल पांड्या

श्रेयस अय्यर

धोनी सध्या रांची येथील आपल्या घरी आहे आणि वाढदिवस त्याच्या कुटुंबासमवेत घरी साजरा करेल. 2004 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या धोनीची कारकीर्द अतुलनीय आहे. धोनीने 90 कसोटी सामन्यांमध्ये 38 च्या सरासरीने 4876 धावा केल्या. याशिवाय त्याने 350 एकदिवसीय सामन्यांमध्ये 50 पेक्षा अधिकच्या सरासरीने 10,773 धावा केल्या आहेत. टी-20 मध्येही धोनी 37 च्या सरासरीने 1617 धावा केल्या. धोनीने 2007 मध्ये प्रथमच टीम इंडियाचे नेतृत्व केला आणि त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने पहिल्या टी-20 विश्वविजेता बनला. यानंतर, 2011 मध्ये त्याने भारताला वनडे विश्वविजेतेपद मिळवून दिले आणि 2013 मध्ये त्याने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. यासह आयसीसीच्या तिन्ही ट्रॉफी जिंकणारा धोनी जगातील पहिला कर्णधार ठरला.