Happy Birthday MS Dhoni: एमएस धोनी याला वाढदिवसानिमित्त डीजे ब्रावोकडून म्यूजिकल गिफ्ट, 'Helicopter 7' गाणं रिलीज (Watch Video)

भारतीय क्रिकेटचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्र सिंह धोनी याचा आज 39 वा वाढदिवस आहे. या दरम्यान वेस्ट इंडिजचा स्टार क्रिकेटर आणि आयपीएल टीम चेन्नई सुपर किंग्जचा सदस्य असलेल्या ड्वेन ब्रावोने वाढदिवसाच्या दिवशी धोनीसाठी 'हेलिकॉप्टर 7' गाणे समर्पित केले आहे.

Happy Birthday MS Dhoni: एमएस धोनी याला वाढदिवसानिमित्त डीजे ब्रावोकडून म्यूजिकल गिफ्ट, 'Helicopter 7' गाणं रिलीज (Watch Video)
ड्वेन ब्रावो आणि एमएस धोनी (Photo Credit: Getty)

भारतीय क्रिकेटचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) याचा आज 39 वा वाढदिवस आहे. त्याचे चाहते अनेक प्रकारचे सरप्राइज देऊन त्याला चकित करण्याचा प्रयत्न करतात. या दरम्यान वेस्ट इंडिजचा स्टार क्रिकेटर आणि आयपीएल (IPL) टीम चेन्नई सुपर किंग्जचा सदस्य असलेल्या ड्वेन ब्रावोने (Dwayne Bravo) वाढदिवसाच्या दिवशी धोनीसाठी एक गाणे समर्पित केले आहे. आणि ते गाणे आता युट्यूबवर रिलीज झाले आहे. या गाण्याची उत्सुकता चाहत्यांमध्ये सुरुवातीपासूनच होती. ब्रावोने 'हेलिकॉप्टर 7' हे गाणे रिलीज केले, जेपूर्णपणे माजी भारतीय कर्णधाराला समर्पित आहे. 10 जुलै, 2019 रोजी टीम इंडियासाठी (Indian Team) अखेरच्या भूमिकेत दिसलेला धोनी सध्या रांचीमधील त्याच्या फार्महाउसवर आहे. रांचीचा सुपरस्टार सोशल मीडियावर अधिक सक्रिय नसला तर त्याची पत्नी साक्षी चाहत्यांसाठी त्याची एक झलक आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करते. धोनीला मैदानावर पाहण्यासाठी चाहत्यांना अजून काही वेळ थांबावे लागणार असले तरी ब्रावोने आपल्या प्रिय मित्राच्या 39 व्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी त्याला खास ट्रिब्यूट दिले. (MS Dhoni Birthday Special: एमएस धोनी याचे 5 धाडसी निर्णय ज्यांनी प्रत्येकाला चकित केले पण बदलला भारतीय क्रिकेटचा चेहरा)

दरम्यान, या गाण्यात ब्रावोने उपलब्धी हायलाईट केली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार असताना धोनीने आयसीसीच्या सर्व ट्रॉफी जिंकल्या जे ब्रावोने हे अतिशय सुंदरपणे आपल्या गायनातून दर्शवले. ब्रावोने आधीपासूनच धोनीला वाढदिवसाला म्यूजिकल गिफ्ट देण्याची तयारी केली होती. ब्रावो चेन्नई सुपर किंग्जकडून अनेक वर्ष आयपीएलमध्ये धोनीच्या नेतृत्वात खेळत आहे. डीजे ब्राव्हो म्हणून ओळखल्या जाणार्‍या या क्रिकेटपटूने धोनीच्या वाढदिवशी गाणे देऊन धोनीला वाढदिवसाची भेट दिली आहे.

पाहा हा ब्रावोच्या 'नंबर 7' गाण्याचा हा व्हिडिओ:

धोनीच्या चाहत्यांना दरवर्षी 7 जुलैची प्रतीक्षा असते. या दिवशी धोनीचा वाढदिवस आहे आणि त्याचे सर्व प्रियजन वेगळ्या प्रकारे हा दिवस साजरे करतात. धोनीने मागील अनेक दिवसांपासून सोशल मीडियापासून दुरावा कायम ठेवला आहे. अलीकडेच त्याच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या पत्नीने एक पोस्ट केले होते जे सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते.

(The above story first appeared on LatestLY on Jul 07, 2020 08:37 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).