Mohammad Siraj (Photo Credit - X)

IND vs SL 2nd ODI: टीम इंडिया सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. दोन्ही देशांमध्ये 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे. पहिला वनडे टाय झाल्यानंतर श्रीलंकेने दुसऱ्या वनडेत (IND vs SL 2nd ODI) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत भारतासमोर 241 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. तत्तपुर्वी सामन्याला सुरुवात होताच श्रीलंकेला पहिल्याच चेंडूवर मोठा धक्का बसला. मोहम्मद सिराजने (Mohammad Siraj) सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर पथुम निसांकाला बाद केले. यानंतर श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात मोहम्मद सिराज भारतीय दिग्गज क्रिकेटपटूंच्या विशेष यादीत सामील झाला. एकदिवसीय सामन्यात नव्या चेंडूने ही मोठी कामगिरी करणारा मोहम्मद सिराज हा चौथा भारतीय गोलंदाज ठरला आहे.

मोहम्मद सिराजला पहिल्याच चेंडूवर मिळाली विकेट

भारत नाणेफेक गमावून गोलंदाजीसाठी मैदानात उतरला. मोहम्मद सिराजने सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर पथुम निसांकाला बाद करून संघाला सुरुवातीचे यश मिळवून दिले. सिराजने ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकला, जो सीमपासून दूर गेला आणि निसांकाच्या बचावावर आदळला आणि काठावर आला. राहुलने झेल पूर्ण केला आणि निसांका गोल्डन डकवर बाद झाला. (हे देखील वाचा: Mohammed Siraj Government Job: मोहम्मद सिराजला सरकारी नोकरी देण्याची तेलंगणा सरकारची घोषणा, जाणून घ्या कोणत्या पदावर करणार काम)

पाहा व्हिडिओ

झहीर खानच्या यादीत समावेश

पथुम निसांकाला बाद केल्यानंतर, 30 वर्षीय सिराज आता डी. मोहंती, झहीर खान आणि प्रवीण कुमार यांच्या विशेष यादीत सामील झाला आहे. वनडे सामन्यात पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारा सिराज हा चौथा भारतीय गोलंदाज ठरला आहे. विशेष म्हणजे झहीर खानने त्याच्या कारकिर्दीत सर्वाधिक चार वेळा विरोधी फलंदाजाला पहिल्याच चेंडूवर बाद केले होते. मात्र, मोहम्मद सिराजला पहिल्या स्पेलमध्ये आणखी एकही बळी घेता आला नाही. पॉवरप्ले दरम्यान त्याने पाच षटकांत 16 धावा दिल्या. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना बरोबरीत सुटला आहे. अशा परिस्थितीत या सामन्यात दोन्ही संघांच्या नजरा विजयाकडे लागल्या आहेत.