Mohammed Siraj (Photo Credit - X)

IND vs SL 3rd ODI: श्रीलंका दौऱ्यावर टीम इंडियाने तीन सामन्यांची टी-20 मालिका 3-0 अशी जिंकली. यानंतर टीम इंडिया (Team India) आता दोन सामन्यांनंतर वनडे मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील भारतीय संघ आज तिसरा सामना जिंकून मालिका पराभव वाचवण्याचा प्रयत्न करेल. या सामन्यात श्रीलंकाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, एक आकडा समोर आला आहे. ज्यामध्ये जसप्रीत बुमराह नाही तर मोहम्मद सिराज आता वनडे क्रिकेटमध्ये राज्य करताना दिसत आहे. (हे देखील वाचा: Mohammed Siraj New Record: मोहम्मद सिराजने रचला एक मोठा विक्रम, झहीर खानच्या यादीत समावेश; असे करणारा केवळ चौथा भारतीय)

भारताकडून सिराजने घेतल्या सर्वाधिक विकेट 

खरं तर, 2022 पासून वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या टॉप-5 गोलंदाजांच्या यादीत मोहम्मद सिराज दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत जसप्रीत बुमराहचे नाव नाही. 2022 पासून सर्वाधिक 72 विकेट्स घेऊन ऑस्ट्रेलियाच्या ॲडम झाम्पाच्या नावावर आहे, तर सिराजचे नाव 70 विकेट्ससह दुसऱ्या स्थानावर आहे. या यादीत कुलदीप यादव 64 बळींसह तिसऱ्या स्थानावर आहे. चौथ्या स्थानावर 58 विकेट्ससह वानिंदू हसरंगा आणि 55 विकेट्ससह पाकिस्तानचा हारिस रौफ आहे.

2022 पासून एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज:-

  1. ॲडम झाम्पा - 72 विकेट्स
  2. मोहम्मद सिराज – 70 विकेट्स
  3. कुलदीप यादव – 64 विकेट्स
  4. वानिंदू हसरंगा – 58 विकेट्स
  5. हरिस रौफ – 55 विकेट्स

सिराजला नंबर वन होण्याची संधी

आता टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात तीन विकेट घेतल्यास तो ऑस्ट्रेलियाच्या झाम्पाला मागे टाकून या यादीत अव्वल स्थानावर येऊ शकतो. सिराजने भारताकडून आतापर्यंत 43 वनडे सामन्यांमध्ये 70 विकेट घेतल्या आहेत. तर श्रीलंकेविरुद्धच्या शेवटच्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याच्या नावावर फक्त दोन विकेट्स आहेत.