Pakistan PM Shehbaz Sharif On Operation Sindoor: भारताकडून करण्यात आलेला एअर स्ट्राईक 'Act of War'; ऑपरेशन सिंदूर वर पाकिस्तान पीएम शहबाज शरीफ यांची प्रतिक्रिया
पाकिस्तान मध्ये ऑपरेशन सिंदूर मध्ये 5 ठिकाणी हल्ले झाल्याचा दावा पाकिस्तानचे पंतप्रधान Shehbaz Sharif यांनी केला आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान Shehbaz Sharif यांनी भारताच्या ऑपरेशन सिंदूर दरम्यान झालेल्या एअर स्ट्राईकची पुष्टी केली आहे. भारताचा हा हवाई हल्ला 'Act of War' असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसंच आमच्यावर युद्ध थोपण्यात आलं असून पाकिस्तान कडून त्याचं उत्तर दिलं जाईल असंही त्यांनी सांगितलं आहे. पाकिस्तान मध्ये ऑपरेशन सिंदूर मध्ये 5 ठिकाणी हल्ले झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. पाकिस्तानी नागरिक आणि सैन्य दलाला याचं उत्तर कसं द्यायचं हे ठाऊक असल्याचं ते म्हणाले आहेत. नक्की वाचा: Operation Sindoor : पहलगाम दहशतवादी हल्ल्याला 'ऑपरेशन सिंदूर' च्या माध्यमातून भारताचं उत्तर; पाकव्याप्त कश्मीर, पाकिस्तान मध्ये 9 ठिकाणी हल्ला.
X वर पोस्ट करत त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'आम्ही शत्रूला त्यांच्या दुर्भावनापूर्ण उद्दिष्टांमध्ये यशस्वी होण्यास देणार नाही.'असं म्हटलं आहे. पाकिस्तानमध्ये भारताच्या हल्ल्यामुळे काही महिला आणि मुलांचा मृत्यू झाल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. त्याबाबतचं सविस्तर निवेदन त्यांनी जारी केलं आहे. नक्की वाचा: Operation Sindoor ने भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त कश्मीर मध्ये कोणत्या 9 दहशतवादी तळांना लक्ष्य केलं? पहा यादी.
पाकिस्तानच्या Inter-Services Public Relations (ISPR) कडून देण्यात आलेल्या माहितीमध्ये भारताचा "तात्पुरता आनंद कायमचा दुःखाने बदलला जाईल" असेही म्हटलं आहे. " भारताने केलेले हल्ले अनुत्तरित राहणार नाहीत. पाकिस्तान आता योग्य जागा आणि वेळ निवडून उत्तर देईल." असेही त्यांनी सांगितलं आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनीही भारतीय हल्ल्यांना मोठ्या प्रमाणात प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे.
(The above story first appeared on LatestLY on May 07, 2025 09:03 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

