Lokmanya Tilak Punyatithi 2026: लोकमान्य टिळक यांना पुण्यतिथी दिनी अभिवादन करण्यासाठी खास WhatsApp Status, Messages

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी दरवर्षी 1 ऑगस्ट रोजी साजरी केली जाते. त्यांचे निधन 1 ऑगस्ट 1920 रोजी मुंबईत झाले होते.

Lokmanya Tilak Punyatithi 2026: लोकमान्य टिळक यांना पुण्यतिथी दिनी अभिवादन करण्यासाठी खास WhatsApp Status, Messages
लोकमान्य टिळक पुण्यतिथी

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक तेजस्वी पर्व म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक (Lokmanya Bal Gangadhar Tilak). "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच" ही त्यांची गर्जना संपूर्ण देशाला जागृत करणारी ठरली. या एका वाक्याने भारतीय जनतेच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत पेटवली. आज 1 ऑगस्ट ही लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी (Lokmanya Bal Gangadhar Tilak Punyatithi) "आधुनिक भारताचे निर्माते" अशी महात्मा गांधीजींनी वर्णन केलेल्या टिळकांच्या त्यागाचे आणि कार्याचे स्मरण केले जाते. लोकमान्य टिळकांना आज त्यांच्या पुण्यतिथीच्या दिनी अभिवादन करण्यासाठी मराठी संदेश, Quotes, WhatsApp Status, Messages शेअर करू शकता.

23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी जन्मलेल्या टिळकांनी आपले संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी समर्पित केले. ब्रिटिशांविरूद्ध समाजाला एकत्र आणण्यासाठी आणि राष्ट्रीय भावना जागृत करण्यासाठी त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव या सणांची सुरूवात केली. आजही सार्वजनिक स्वरूपात हे सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.

लोकमान्य टिळक यांना पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन

 

Bal Gangadhar Tilak Punyatithi
टिळक पुण्यतिथी 2026
Bal Gangadhar Tilak Punyatithi date
लोकमान्य टिळक पुण्यतिथी 2026 स्टेटस
Bal Gangadhar Tilak Punyatithi Quotes
बाळ गंगाधर टिळक स्मृतिदिन
Bal Gangadhar Tilak Punyatithi Messages in Marathi
लोकमान्य टिळक पुण्यतिथी

लोकमान्य टिळकांनी 'केसरी' आणि 'मराठा' या वृत्तपत्रांच्या माध्यमातून ब्रिटिश सरकारच्या अन्यायकारक धोरणांविरुद्ध लोकांना जागृत केले. त्यांच्या निर्भीड लेखणीमुळे त्यांना अनेकदा कारावासही भोगावा लागला. मंडाले येथील तुरुंगवासात असतानाही त्यांनी खचून न जाता 'गीतारहस्य' हा ग्रंथ लिहिला, जो आजही तत्त्वज्ञानाच्या अभ्यासकांसाठी मार्गदर्शक ठरतो.जनतेने त्यांना दिलेली 'लोकमान्य' ही पदवीच त्यांच्या लोकप्रियतेची आणि कर्तृत्वाची साक्ष देते.

(The above story first appeared on LatestLY on Aug 01, 2026 08:00 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).