मुंबई, ठाणे, पालघर परिसरामध्ये काल 6 मे च्य रात्री पाऊस आणि वादळी वारा झाल्यानंतर आज 7 मे दिवशी देखील ढगाळ वातावरण आहे. हवामान विभागाकडून मुंबई आणि आजुबाजूच्या शहरांना यलो अलर्ट जारी केला असल्याने अधून मधून सरी बरसण्याचा अंदाज आहे. आज सकाळपासूनच वातावरणामध्ये थोडा गारवा असल्याने ऐन मे महिन्यामध्ये कडक उन्हाच्या झळांपासून नागरिकांची सुटका झाली आहे. नक्की वाचा: Maharashtra Weather Update: मुंबई, पुणे, नाशिकसह 'या' जिल्ह्यात 8 मे पर्यंत सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा अंदाज.
मुंबई मध्ये ढगाळ वातावरण
Few passing showers from Bandra-Worli to Churchgate stretch next 30 mis | 8:10 AM #MumbaiRains
— Mumbai Rains (@rushikesh_agre_) May 7, 2025
पालघर मध्ये सकाळी पाऊस
सर आज सकाळी ९.० वाजता वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत आहे. ठिकाण उमरोळी, पालघर pic.twitter.com/fdKsRZWqhq
— Mahesh Patil, DVPSS (@MaheshLPatil4) May 7, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)