Britain Cricket - Pakistan Press Conference - The Oval - June 17, 2017 Pakistan Head Coach Mickey Arthur and Sarfraz Ahmed during the press conference Action Images via Reuters / Paul Childs Livepic EDITORIAL USE ONLY.

इंग्लंड (England) आणि वेल्समध्ये खेळवण्यात आलेल्या आयसीसी (ICC) क्रिकेट विश्वचषकमध्ये पाकिस्तान (Pakistan) संघाच्या निराशाजनक खेळीनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डने टीमचे कोच मिकी आर्थर (Micky Arthur) आणि सपोर्ट स्टाफ यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. मुख्य प्रशिक्षकासह कोचिंग कर्मचार्‍यांची पीसीबीने (PCB) सुट्टी केली आहे. यंदाच्या विश्वचषकमध्ये पाकिस्तानी संघ सेमीफायनल सामन्याआधीच बाहेर पडला होता. साखळी सामन्यात पाकिस्तानने 9 पैकी 5 सामने जिंकले तर 1 सामना पावसामुळे रद्द झाला होता. पाकिस्तानच्या संघाला एकूण 11 गुण होते आणि निव्वळ रनरेटच्या जोरावर संघ प्लेऑफमध्ये स्थान मिळवू शकला नाही. (बकरी-ईदच्या अगोदर कुर्बानी फोटोज शेअर करत सरफराज अहमद याने ओढवला चाहत्यांचा रोष, Netizens ने PETA कडे केली कारवाईची मागणी)

पाकिस्तान क्रिकेट बोर्डने विश्वचषकातील कामगिरी आणि गेल्या काही वर्षातील कामगिरी लक्षात घेत पाकिस्तानचे ज्येष्ठ संघाचे मुख्य प्रशिक्षक मिकी आर्थर, गोलंदाजी प्रशिक्षक अझर मेहमूद (Azhar Mahmood), फलंदाजी प्रशिक्षक ग्रँट फ्लॉवर (Grant Flower) आणि प्रशिक्षक ग्रँट लुडेन (Grant Luden) यांचा करार संपवला आहे. मिकी आर्थर आणि उर्वरित सपोर्ट स्टाफचा कार्यकाळ 15 ऑगस्ट रोजी संपणार आहे. आणि बुधवारी पीसीबीच्या क्रिकेट समितीने त्यांच्या कराराचे नूतनीकरण न करण्याचा निर्णय घेतला आहे. पीसीबीच्या या निर्णयाबाबत प्रतिक्रिया देत आर्थर म्हणाले की त्यांना निराशा आणि दुःख झाला आहे.

'मी अत्यंत निराश आणि दु:खी आहे, 'असे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने प्रस्थान जाहीर केल्यानंतर माजी क्रिकेटपटूने AFP ला सांगितले. 'पाकिस्तान क्रिकेट उंचावण्यासाठी मी मनापासून प्रयत्न केले', आर्थर म्हणाले. दरम्यान, पीसीबीची क्रिकेट कमिटीने हे देखील म्हटले की ते लवकरच नवीन मुख्य प्रशिक्षक आणि सहाय्य्क कर्मचार्‍यांसाठी जाहिराती जाहीर करेल. महत्त्वाचे म्हणजे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने जेव्हा हेड कोच आर्थरबरोबरच्या कामगिरी आढावा घेण्यासाठी बैठक घेतली तेव्हा प्रशिक्षकांनी कर्णधार सरफराज अमहद याला देखील त्याच्या कर्णधार पदावरून काढून टाकण्याची शिफारस केली. प्रशिक्षक आर्थरने याच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघाने 2017 मध्ये भारताचा पराभव करून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. शिवाय त्यांच्या प्रशिक्षक कारकीर्दीत पाकिस्तानचा संघ बर्‍याच काळापासून टी-20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत अव्वल क्रमांकावर आहे.