‘Ball Tampering बद्दल ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना माहिती होती’, चेंडूशी छेडछाड प्रकरणी बॅनक्रॉफ्टच्या विधानावर माजी Australian कर्णधारची मोठी प्रतिक्रिया
Steve Smith and David Warner (Photo Credit: Getty)

Ball Tampering Scandal: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) 2018 मध्ये झालेल्या कसोटी सामन्यात संघाच्या बॉल टेंपरिंगच्या (Ball Tampering_ युक्त्यांबद्दल तीनपेक्षा जास्त लोकांना माहित असलेल्या कॅमरून बॅनक्रॉफ्टच्या (Cameron Bancroft) विधानावर आश्चर्य वाटले नाही असे ऑस्ट्रेलियाचे माजी वर्ल्ड कप विजेता कर्णधार माइकल क्लार्क (Michael Clarke) यांनी म्हटले. बॅनक्रॉफ्ट केप टाऊनमधील (Cape Town) तिसर्‍या कसोटी सामन्यात बॉलवर सॅंडपेपर (Sandpapaer) वापरताना कॅमेऱ्यात पकडला गेला तेव्हा संपूर्ण घोटाळा समोर आला. तत्कालीन कर्णधार स्टीव्ह स्मिथ, डेविड वॉर्नर आणि बॅनक्रॉफ्ट यांच्यावर चेंडूशी छेडछाड प्रकरणात काही काळ बंदी घालण्यात आली होती. वॉर्नर आणि स्टीव्ह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतले, परंतु नऊ महिन्यांच्या शिक्षेनंतर बेनक्रॉफ्ट आपला गमावलेला दर्जा परत मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे.

दरम्यान, त्याने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना बॉल टेंपरिंगच्या घटनेविषयी माहिती असल्याचे उघड केले होते. ‘द गार्डियनला दिलेल्या मुलाखतीत बॅनक्रॉफ्टने सांगितले होते की त्याने मैदानावर जे काही केले त्याबद्दल आपण जबाबदार आहे. “बॉल टेम्परिंग प्रकरणाची माहिती बॉलर्सना होती. मात्र तरीही मला, वॉर्नरला आणि स्मिथला या प्रकरणात शिक्षा झाली. मी या प्रकरणात केलेल्या कृतीला जबाबदार आहे. पण याची माहिती टीमला होती. माझ्या कृतीचा फायदा बॉलर्सनाच होणार होता. ही एकच गोष्ट हे पटवून देण्यासाठी पुरेशी आहे.” बॅनक्रॉफ्टच्या विधानावर क्लार्कने फॉक्स स्पोर्ट्सला सांगितले की, “आपण चेंडू बॉलरकडे परत फेकला आहे आणि गोलंदाजाला याबद्दल माहिती नाही?” अखेरीस अडकलेल्या आणि बंदी घातलेल्या तिघांपेक्षा संघात जास्त लोकांना माहित आहे या बॅनक्रॉफ्टच्या विधानावर कोणालाही आश्चर्य वाटू नये असे क्लार्कने सांगितले.

“या स्तरावर खेळणाऱ्या खेळाडूंना मैदानात वापरल्या जाणाऱ्या साहित्याबद्दल सविस्तर माहिती असते. त्यांना बॉल टेम्परिंग झाल्याचं समजलं नाही यावर विश्वास ठेवणे अवघड आहे. मॅच खेळताना माझ्या बॅटमध्ये काही बदल झाला तर मला लक्षात येतं. तसंच बॉलर्सना देखील त्यांनी बॉल पाहिल्यावर त्यामध्ये काय बदल होतो हे लगेच समजतं,” क्लार्कने स्पष्ट केलं.