Mumbai Indians Women vs Delhi Capitals Women, WPL 2025 2nd Match Scorecard Update:  महिला प्रीमियर लीग 2025 (Women's Premier League 2025 ) 14 फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. या लीगमध्ये चाहत्यांना दररोज रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. या लीगमध्ये पाच संघांनी भाग घेतला आहे. स्पर्धेतील दुसरा सामना मुंबई इंडियन्स महिला आणि दिल्ली कॅपिटल महिला यांच्यात खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना वडोदऱ्यातील (Vadodara)  कोटाम्बी स्टेडियमवर (Kotambi Stadium) खेळला जात आहे. दोन्ही संघांमध्ये अनेक नवीन बदल झाले आहेत, ज्यामुळे सामना अधिक रोमांचक होऊ शकतो. यावेळी मुंबई इंडियाचे नेतृत्व हरमनप्रीत कौर  (Harmanpreet Kaur)  करत आहे. तर, दिल्ली कॅपिटल्सची कमान मेग लॅनिंगच्या (Meg Lanning) खांद्यावर आहे.

दरम्यान, स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार मेग लॅनिंगने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावल्यानंतर, मुंबई इंडियन्स प्रथम फलंदाजी करण्यासाठी आला आणि त्यांची सुरुवात निराशाजनक झाली आणि संघाला पहिला मोठा धक्का फक्त 1 धावेच्या धावसंख्येत बसला.

मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ 19.1 षटकात 164 धावा करून सर्वबाद झाला. मुंबई इंडियन्ससाठी, स्टार अष्टपैलू नॅट सायव्हर-ब्रंटने सर्वाधिक नाबाद 80 धावांची खेळी केली. या धमाकेदार खेळीदरम्यान, नॅट सायव्हर-ब्रंटने 59 चेंडूत 13 चौकार मारले. नॅट सायव्हर-ब्रंट व्यतिरिक्त, कर्णधार हरमनप्रीत कौरने 42 धावा केल्या.

दुसरीकडे, हा सामना जिंकण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स संघाला 20 षटकांत 165 धावा कराव्या लागतील. दोन्ही संघ पहिला टी-20 सामना जिंकून स्पर्धेची सुरुवात विजयाने करू इच्छितात.

पहिल्या डावातील धावफलक:

मुंबई इंडियन्स फलंदाजी: 164/10, 19.1 षटकांत (हेली मॅथ्यूज 0 धावा, यास्तिका भाटिया 11 धावा, नॅट सायव्हर-ब्रंट 80 धावा नाबाद, हरमनप्रीत कौर 42 धावा, अमेलिया केर 9 धावा, सजीवन सजना 1 धावा, अमनजोत कौर 7 धावा, जिंतीमणी कलिता 1 धावा, संस्कृती गुप्ता 2 धावा, शबनीम इस्माईल 0 धावा, सईका इशाक 0 धावा.)

दिल्ली कॅपिटल्स गोलंदाजी: (शिखा पांडे 2 बळी, अ‍ॅनाबेल सदरलँड 3 बळी, मिन्नू मणी 1 बळी आणि अ‍ॅलिस कॅप्सी 1 बळी)