MI vs RCB, IPL 2020: मुंबई इंडियन्सने जिंकला टॉस, पहिले गोलंदाजीचा घेतला निर्णय; आरसीबी प्लेइंग इलेव्हनमध्ये 3 बदल
विराट कोहली आणि केरॉन पोलार्ड (Photo Credit: PTI/Instagram)

MI vs RCB, IPL 2020: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू (Royal Challengers Bangalore) यांच्यात इंडियन्स प्रीमिअर लीगचा (Indian Premier League) 48वा सामना अबू धाबी येथे थोड्याच वेळात सुरु होईल. आजच्या सामन्यात पुन्हा एकदा किरोन पोलार्ड (Kieron Pollard) मुंबईचे नेतृत्व करत आहे. आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार किरोन पोलार्डने टॉस जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आजच्या सामन्यासाठी मुंबईने प्लेइंग इलेव्हनमध्ये एकही बदल केलेला नाही तर आरबीकडून काही बदल झाले आहेत. आयपीएलमध्ये (IPL) सध्या प्रतिस्पर्धी आठवडा सुरु आहे. दोन्ही संघांसाठी आजचा सामना महत्वाचा आहे. आजच्या सामन्यात विजय मिळवून एक टीम प्ले ऑफमध्ये आपले स्थान निश्चित करेल. एमआय आणि आरसीबी, दोन्ही संघांचे 14 गुण आहेत, मात्र मुंबई निव्वळ नेट रनरेटच्या आधारावर गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. अशा स्थितीत मुंबई आणि बेंगलोर आजच्या सामन्यात विजय मिळवून अंतिम-4मध्ये पोहचण्याच्य निर्धारित असतील. (IPL 13: कर्णधार म्हणून पहिल्या सामन्यात 'या' 5 खेळाडूंनी केला तडाखा, खेळला तुफानी डाव; लिस्टमध्ये दोन भारतीयांचाही समावेश)

रोहितच्या अनुपस्थितीत मुंबईसाठी पुन्हा एकदा क्विंटन डी कॉक आणि ईशान किशनची जोडी मैदानात उतरेल. सूर्यकुमार यादव तिसऱ्या स्थानावर फलंदाजी करेल. सौरभ तिवारी, किरोन पोलार्ड, हार्दिक पांड्या आणि क्रुणाल पांड्या मधल्या फळीची जबाबदारी सांभाळतील. गोलंदाजीत जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, जेम्स पॅटिन्सन, राहुल चाहर आणि ट्रेंट बोल्ट यांच्यावर जबाबदारी असेल. दुसरीकडे, आयपीएलकडून आजच्या सामन्यासाठी तीन बदल झाले आहेत. आरसीबीने आरोन फिंच, दुखापत झालेल्या नवदीप सैनी आणि मोईन अली यांना बाहेर केले असून त्यांच्या जागी जोश फिलिप, शिवम दुबे आणि डेल स्टेन यांचा समावेश करण्यात आला आहे.

पाहा एमआय आणि आरसीबी प्लेइंग इलेव्हन

मुंबई इंडियन्स: क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), ईशान किशन, सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा/ सौरभ तिवारी, हार्दिक पांड्या, कीरोन पोलार्ड (कॅप्टन), कृणाल पांड्या, जेम्स पॅटिन्सन, राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर: देवदत्त पडिक्कल, जोश फिलिप, विराट कोहली (कॅप्टन), एबी डिव्हिलिअर्स (विकेटकीपर), गुरकीरत सिंह, शिवम दुबे, क्रिस मॉरिस, वाशिंगटन सुंदर, डेल स्टेन, मोहम्मद सिराज आणि युजवेंद्र चहल.