MI vs KXIP, IPL 2020 Live Streaming: मुंबई इंडियन्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Hotstar आणि Star Network वर
मुंबई इंडियन्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब (Photo Credit: File Image)

MI vs KXIP, IPL 2020 Live Streaming: इंडियन प्रीमिअर लीग (Indian Premier League) 2020 चा 36 वा सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि किंग्ज इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) यांच्यात रविवारी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर (Dubai International Stadium) खेळला जाईल. 8 सामन्यापैकी 6 सामने जिंकून मुंबई संघ 12 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहेत, तर पंजाब संघाने 8 पैकी केवळ 2 सामने जिंकले आहेत. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता टॉस होणार असून सामना 7:30 वाजता सुरु होणार आहे. मुंबई इंडियन्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे. तसेच Hotstar अ‍ॅपवरदेखील या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि एअरटेलने त्यांच्या ग्राहकांना काही खास ऑफर दिल्या आहेत ज्याच्या उपयोग करून यूजर्स ऑनलाईन मॅच पाहू शकतात. (IPL 2020: 'पुन्हा ती चूक करू नकोस', KKRविरुद्ध केलेल्या चुकीनंतर MI प्रशिक्षक महेला जयवर्धची क्विंटन डी कॉकला चेतावणी Watch Video)

आजच्या सामन्यात विजयाने मुंबई प्ले-ऑफच्या अगदी जवळ पोहचेल तर पंजाब आणखी एका पराभवामुळे शर्यतीतून बाहेर पडेल. आयपीएलमध्ये आतापर्यंत मुंबई इंडियन्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात 25 वेळा सामना झाला आहे. त्यापैकी मुंबईने 14 वेळा आणि पंजाबने 11 वेळा विजय मिळविला आहे. मात्र, पंजाबकडून 'युनिव्हर्स बॉस' क्रिस गेलने मागील सामन्यातून दमदार आगमन केले ज्यामुळे आजचा सामना रंगतदार होण्याची पूर्ण शक्यता आहे. शिवाय, सलग पाच सामने जिंकून बाद फेरीच्या दिशेने आगेकूच करणाऱ्या मुंबईचा विजयीरथ रोखण्याचेही आव्हान पंजाबसमोर असेल.

पाहा एमआय आणि केएक्सायपी संघ

मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा (कॅप्टन), क्विंटन डी कॉक, किरोन पोलार्ड, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट, जेम्स पॅटिन्सन, सौरव तिवारी, धवल कुलकर्णी, आदित्य तरे, क्रिस लिन, मिशेल मॅकक्लेनाघन, नॅथन कूटर-नाईल, जयंत यादव, अनमोलप्रीत सिंह, अनुकूल रॉय, मोहसिन खान, शेरफेन रदरफोर्ड, दिग्विजय देशमुख, प्रिंस बलवंत राय.

किंग्स इलेव्हन पंजाब: केएल राहुल (कॅप्टन), मयंक अग्रवाल, क्रिस गेल, करून नायर, हरप्रीत ब्रार, ईशान पोरेल, मनदीप सिंग, जेम्स नीशम, तजिंदर सिंग, क्रिस जॉर्डन, करुण नायर, दीपक हूडा, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंह, ग्लेन मॅक्सवेल, मुजीब उर रहमान, सरफराज खान, शेल्डन कॉटरेल, मयंक अग्रवाल, मोहम्मद शमी, दर्शन नलकंडे, निकोलस पूरन, मुरुगन अश्विन, जगदीशा सुचित, कृष्णाप्पा गौथम, हार्दस विल्जॉईन, सिमरन सिंह.