MI vs KXIP, IPL 2020: किंग्स इलेव्हनने रोखला मुंबईचा विजयरथ, 'सुपर' विजय मिळवत दिला पराभवाचा दणका
किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार केएल राहुल (Photo Credit: PTI)

MI vs KXIP, IPL 2020: आयपीएलच्या (IPL) आजच्या दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) पहिले फलंदाजी करून दिलेल्या 177 धावांच्या प्रत्युत्तरात किंग्स इलेव्हन पंजाबने (Kings XI Punjab) कर्णधार केएल राहुलच्या (KL Rahul) तुफानी अर्धशतकाच्या जोरावर 5 विकेटने 177 धावांपर्यंत मजल मारली आणि सामना टाय झाला. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदा एका दिवसांत दोन सामन्याचा निर्णय सुपर ओव्हरमध्ये लागला. मुंबईने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना किंग्स इलेव्हनकडून कर्णधार राहुलने 77 धावांचा दमदार डाव खेळला, पण पंजाबने अखेरच्या चेंडूवर हाराकिरी केल्यामुळे सामना बरोबरीत सुटला. पंजाबकडून राहुल आणि निकोलस पूरनने सुपर ओव्हरमध्ये 5 धावा करून एमआयला (MI) 6 धावांचे लक्ष्य दिले. प्रयुततरात पहिली सुपर ओव्हर देखील अनिर्णीत राहिल्याने नियमानुसार दुसरी सुपर ओव्हर झाली ज्यात मुंबईसाठी किरोन पोलार्ड आणि हार्दिक पांड्याची जोडी आली. हार्दिक एक धाव करून धावबाद झाला. मुंबईने 11 धावा केल्या आणि पंजाबसमोर 12 धावांचे लक्ष्य दिले. प्रत्युत्तरात क्रिस गेल (Chris Gayle) आणि मयंक अग्रवालच्या (Mayank Agarwal) जोडीने सहज विजय मिळवला आणि मुंबईला सलग पाच विजयानंतर पहिल्या पराभवाचा दणका दिला. (MI vs KXIP, IPL 2020: क्विंटन डी कॉकचे झुंझार अर्धशतक, कीरोन पोलार्डच्या फटकेबाजीने MIचे किंग्स इलेव्हनसमोर 177 धावांचे लक्ष्य)

जसप्रीत बुमराहने किंग्स इलेव्हनला पहिला धक्का दिला आणि 33 च्या स्कोरवर मयंकला त्रिफळाचीत करून सलामी जोडी फोडली. त्यानंतर राहुल आणि गेल पंजाबचा डाव सावरत असताना 21 चेंडूत 24 धावा काढत गेल माघारी परतला. बुमराहच्या बाऊंसर चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात पूरन 12 चेंडूत 24 धावा काढत माघारी परतला. चाहरने एकाच ओव्हरमध्ये पूरन आणि मॅक्सवेलला बाद करून पंजाबला दणका दिला. या दरम्यान, राहुलने आपला प्रभावी खेळ करत दमदार अर्धशतक ठोकले. त्यानंतर चाहरने ग्लेन मॅक्सवेलला शून्यावर माघारी धाडलं. पण राहुलने दीपक हूडाच्या साथीने टीमचा विजय निश्चित केला. दीपक चेंडूत नाबाद धावा करून परतला. पंजाब विजय नोंदवलं असे दिसत असताना बुमराहने घातक ठरत असलेल्या राहुलला बोल्ड केले. अखेरीस क्रिस जॉर्डन आणि हुडाने टीमला विजय रेषा ओलांडून दिली. जॉर्डनने 13 आणि हुडा नाबाद 23 धावा करून परतला. राहुलला वगळता क्रिस गेल आणि पूरन यांनी प्रत्येकी 24 धावा केल्या, तर मयंक आज 11 धावाच करू शकला. दुसरीकडे, मुंबईसाठी जसप्रीत बुमराहने 2, राहुल चाहरने 2 गडी बाद केले तर ट्रेंट बोल्टला एक यश मिळाले.

यापूर्वी, मुंबई इंडियन्सने क्विंटन डी कॉकचे अर्धशतक आणि अखेरच्या फळीत फलंदाजांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर सामन्यात 176 धावांपर्यंत मजल मारली. मुंबईच्या आघाडीच्या फलंदाजांनी आज निराशा केली, परंतू डी कॉक आणि अखेर पोलार्ड व कुल्टर नाईलने फटकेबाजी करत मुंबईला आश्वासक धावसंख्या गाठून दिली. डी कॉकने 43 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटकारांसह 53 धावा केल्या. पंजाबकडून मोहम्मद शमी, अर्शदीप सिंहने प्रत्येकी 2 तर क्रिस जॉर्डन आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.