मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स (Photo Credit: PTI)

MI vs KKR, IPL 2020: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्या आयपीएलच्या (IPL) 32व्या सामन्यात रंगतदार लढत पाहायला मिळणार आहे. अबू धाबी (Abu Dhabi) येथील शेख झायेद स्टेडियमवर आजचा हा सामना खेळला जाणार आहे. आजच्या सामन्याच्या टॉस दरम्यान केकेआरचा कर्णधार इयन मॉर्गनने नाणेफेक जिंकली आणि पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आजच्या सामन्यासाठी मुंबईने प्लेइंग इलेव्हनमध्ये एक तर नाईट रायडर्सने दोन बदल केले आहेत. केकेआरमध्ये (KKR) सामन्यापूर्वीच मोठा बदल झाला आहे. दिनेश कार्तिकने (Dinesh Karthin) कर्णधारपदाची राजीनामा दिला असून त्याच्या जागी मॉर्गनकडे नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. कोलकाता नाइट रायडर्सने सात पैकी चार सामने जिंकले आहेत आणि आठ गुणांसह चौथे स्थान मिळवले असून मुंबई इंडियन्सची टीम पूर्णपणे लयीत आहे. रोहितच्या नेतृत्वात संघाने सलग चार सामने जिंकले असून सातपैकी पाच सामने जिंकून ते गुणतालिकेत दुसर्‍या स्थानावर आहेत. आजचा सामना जिंकून दोन्ही संघ आपले स्थान मजबूत करू इच्छित असतील. (IPL 2020: आयपीएल पर्वाच्या मध्यावर इयन मॉर्गन KKR संघाचा कर्णधार; पाहा आणखी कोणाकोणाला मिळाली होती अशीच जबाबदारी)

मुंबई इंडियन्सने प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केला आहे. जेम्स पॅटिन्सनचा वर्कलोड लक्षात घेता त्याला बाहेर केले असून त्याच्या जागी नॅथन कोल्टर-नाईलला संधी मिळाली आहे. टीमसाठी रोहित शर्मा आणि क्विंटन डिकॉक पुन्हा एकदा सलामीला येतील. रोहितच्या नेतृत्वात टीमने आजवर चेंडू आणि बॅटने प्रभावी कामगिरी बजावली आहे आणि आजच्या सामन्यात देखील ते आपला विजय रथ कायम ठेवू पाहत असतील. दुसरीकडे, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध पराभवानंतरही केकेआरने प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल केला आहेत. केकेआरने क्रिस ग्रीन आणि शिवम मावी यांना अनुक्रमे टॉम बंटन आणि कमलेश नागरकोटी यांचा समावेश केला आहे. क्रिस ग्रीनचा हा पहिला आयपीएल सामना आहे.

पाहा एमआय आणि केकेआर प्लेइंग इलेव्हन

मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा (कॅप्टन), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, ईशान किशन, हार्दिक पांड्या, कीरोन पोलार्ड, कृणाल पांड्या, राहुल चाहर, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट आणि जेम्स पॅटिन्सन.

कोलकाता नाईट रायडर्स: राहुल त्रिपाठी, शुभमन गिल, नीतीश राणा, इयन मॉर्गन (कॅप्टन), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), आंद्रे रसेल, सुनील नारायण/टॉम बंटन, कमलेश नागरकोटी, वरुण चक्रवर्ती, प्रसिद्ध कृष्णा आणि पॅट कमिन्स.