इयन मॉर्गन, दिनेश कार्तिक (Photo Credit: Getty/PTI)

मुंबई इंडियन्सविरुद्ध आयपीएल (IPL) सामन्याच्या काही तासांपूर्वी दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) कोलकाता नाईट रायडर्सचे (Kolkata Knight Riders) कर्णधारपद सोडलं. कार्तिकऐवजी इंग्लंडच्या वनडे टीमचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार इयन मॉर्गनकडे (Eoin Morgan) आता केकेआरचं (KKR) नेतृत्व देण्यात आलं आहे. हा निर्णय केवळ नाइट रायडर्ससाठीच नव्हे तर मोठ्या संघर्षासाठी तयार होणारे चाहते आणि तज्ञ यांच्यासाठी आश्चर्यचकित करणारा निर्णय ठरला. विश्वचषक स्पर्धेनंतर मॉर्गन विकत घेतल्या नंतरही केकेआर दिनेशकडे नेतृत्व कायम ठेवले होते. तथापि, 7 सामन्यानंतर अखेर कार्तिकने राजीनामा दिला. यंदा कार्तिकच्या नेतृत्वात केकेआरने केवळ 3 गमावले, तर 4 जिंकून गुणतालिकेत पहिल्या 4 मध्ये स्थान मिळविले. परंतु, मोसमाच्या मध्यावर खेळाडूने कर्णधारपद सोडण्याची ही पहिलीच वेळ नाही. पहिल्या हंगामापासून ते आयपीएल 2018 पर्यंत मध्यभागी कर्णधारपदाच्या (IPL Mid-Season Captaincy) बदलांच्या संदर्भात काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. (IPL 2020: MI विरुद्ध आयपीएल सामन्यापूर्वी दिनेश कार्तिकने इयन मॉर्गनकडे सोपवली KKR कर्णधारपदाची जबाबदारी, 'हे' सांगितले कारण)

आयपीएलमध्ये काही कर्णधार यशस्वी झाले तर काहींना ते अवघड झाले आणि फ्रँचायझीने त्यांच्या जागी आयपीएलच्या मध्यावर दुसऱ्या खेळाडूकडे जबाबदार दिली. या सर्वांमध्ये विराट कोहली, स्टिव्ह स्मिथ, रोहित शर्मा, डॅरेन सॅमी, मुरली विजय, श्रेयस अय्यर अशा खेळाडूंचा समावेश आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराटने डॅनियल व्हेटोरी, 'हिटमॅन' रोहितने रिकी पॉन्टिंग, स्मिथने शेन वॉटसन यांच्या जागी आयपीएलच्या मिड-सिझन दरम्यान कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली होती.

दुसरीकडे, कार्तिकने कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयावर केकेआरचे सीईओ वैंकी मैसूर यांनी माहिती दिली. ‘‘एवढा मोठा निर्णय घेण्यासाठी हिंमत गरजेची असते. आम्हीही त्याच्या निर्णयाने आश्चर्यचकीत झालो आहोत, पण आम्ही त्याच्या या निर्णयाचा सन्मान करतो. दिनेश कार्तिकने नेहमीच पहिले टीमचा विचार केला. 2019 वर्ल्ड कप विजेता कर्णधार इयन मॉर्गन, जो कोलकाताचा उपकर्णधार होता, तो आता संघाचे नेतृत्व करणार असल्यानेही आम्ही आनंदी आहोत. कार्तिक आणि मॉर्गन यांनी या स्पर्धेत एकत्र चांगले काम केले आहे. आम्हाला आशा आहे की हा बदल आमच्यासाठी योग्य ठरेल.’’ वैंकी मैसूर म्हणाले. आयपीएलच्या यंदाच्या मोसमात कार्तिकची कामगिरी समाधानकारक राहिली नाही. मागील सामन्यात त्याने फक्त 1 धाव केली तर यंदाच्या मोसमात 7 डावात त्याने 108 धावा केल्या आहेत, यामध्ये एका अर्धशतकाचाही समावेश आहे.