
Gujarat Titans vs Mumbai Indians: आयपीएल 2025 (IPL 2025) नववा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (Gujarat Titans vs Mumbai Indians) यांच्यात खेळवला जाणार आहे. हा सामना नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद (Narendra Modi Stadium, Ahmedabad) येथे संध्याकाळी 7.30 सुरु होईल. गुजरात टायटन्सला पंजाबविरुद्ध पहिला सामना गमवावा लागला आहे. तर मुंबई इंडियन्सला चेन्नईविरुद्ध पहिल्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत, दोन्ही संघ आपल्या पहिल्या विजयासाठी उत्सुक असणार आहे. म्हणूनच आजचा सामना मनोरंजक असेल. गुजरातचे कर्णधारपद शुभमन गिलकडे आहे. तर, मुंबईची कमान हार्दिक पांड्याकडे आहे.
खेळपट्टी अहवाल
अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमच्या खेळपट्टीबद्दल बोलायचे झाले तर, ती फलंदाजांसाठी उपयुक्त ठरेल. या हंगामातील पहिल्या सामन्यात पंजाब किंग्जने 243 धावा केल्या होत्या. यानंतर गुजरातला फक्त 11 धावांनी पराभव पत्करावा लागला. गुजरात आणि मुंबई यांच्यातील सामन्यातही चौकार आणि षटकारांचा पाऊस पडू शकतो. पुन्हा एकदा येथे एक उच्च धावसंख्या असलेला सामना पाहता येईल. (हे देखील वाचा: GT vs MI IPL 2025 Head to Head Records: गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्या आकडेवारीत कोणाचे आहे वर्चस्व? सामन्यापूर्वी हेड-टू-हेड रेकॉर्ड पहा)
कोण जिंकू शकतो हा सामना?
या सामन्यातील सर्व आकडेवारी लक्षात घेता, गुजरात संघाचा संघ वरचढ असल्याचे दिसून येते कारण त्यांनी घरच्या मैदानावर मुंबई इंडियन्सविरुद्ध आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. दुसरीकडे, या सामन्यात नाणेफेक खूप महत्त्वाची असणार आहे, ज्यामध्ये लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाकडून विजयाची अपेक्षा जास्त असू शकते. तथापि, क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ म्हटले जाते. अशा परिस्थितीत या सामन्यात काहीही भाकित करणे कठीण आहे.
गुजरात टायटन्सची जिंकण्याची शक्यता: 60%
मुंबई इंडियन्सच्या विजयाची शक्यता: 40%
दोन्ही संघाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
गुजरात टायटन्स: शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जोस बटलर (विकेटकीपर), शेरफेन रदरफोर्ड, राहुल तेवतिया, शाहरुख खान, रशीद खान, साई किशोर, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा
मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), नमन धीर, मिशेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, सत्यनारायण राजू.