MI vs DC, IPL 2020 Qualifer 1 Live Streaming: मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील आयपीएलचा पहिला क्वालिफायर लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Hotstar आणि Star Network वर
मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Photo Credit: PTI)

MI vs DC, IPL 2020 Qualifer 1 Live Streaming: आयपीएल 2020 चा पहिला क्वालिफायर सामना आज मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जाईल. आजच्या सामन्यातील विजेता संघ आयपीएल 13च्या फायनलमध्ये पोहचेल. मुंबई आणि दिल्ली यांच्यातील आजचा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. भारतीय वेळेनुसार, आज 5 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता टॉस होणार असून सामना 7.30 वाजता सुरु होणार आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे. तसेच Disney+ Hotstar अ‍ॅपवरदेखील या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि एअरटेलने त्यांच्या ग्राहकांना काही खास ऑफर दिल्या आहेत. ज्याच्या उपयोग करून यूजर्स ऑनलाईन मॅच पाहू शकतात. (MI vs DC, IPL 2020 Qualifier 1: रोहित शर्माच्या 'या' कमजोरीचा दिल्ली कॅपिटल्स उचलणार फायदा, MI विरुद्ध आयपीएल क्वालिफायरपूर्वी शिखर धवनचे मोठे विधान)

एकीकडे मुंबई इंडियन्सने आजवर सर्वाधिक चार विजेतेपद जिंकले आहेत, तर दिल्ली संघ एकदा देखील असे करण्यात अपयशी ठरला आहे. गेल्या काही हंगामात सलग फ्लॉप कामगिरीनंतर टीमने मागील वर्षी पहिल्यांदा प्ले ऑफमध्ये प्रवेश  केला होता. मुंबईने अव्वल राहून प्ले ऑफमध्ये स्थान मिळवले, तर दिल्ली संघ दुसर्‍या स्थानावर राहिला. दिल्ली संघाचा प्रथमच फायनलचं काढण्याचा मानस असेल, तर मुंबई सलग दुसऱ्यांदा अंतिम सामन्यात स्थान मिळवण्याच्या निर्धारित असेल. विशेष म्हणजे यंदाच्या स्पर्धेत दिल्लीला मुंबईला पराभूत करता आलेले नाही.

पाहा मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघ

मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा (कॅप्टन), क्विंटन डी कॉक, किरोन पोलार्ड, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट, जेम्स पॅटिन्सन, सौरव तिवारी, धवल कुलकर्णी, आदित्य तरे, क्रिस लिन, मिशेल मॅकक्लेनाघन, नॅथन कोल्टर-नाईल, जयंत यादव, अनमोलप्रीत सिंह, अनुकूल रॉय, मोहसिन खान, शेरफेन रदरफोर्ड, दिग्विजय देशमुख, प्रिंस बलवंत राय.

दिल्ली कॅपिटल्स: श्रेयस अय्यर (कॅप्टन), कगिसो रबाडा, पृथ्वी शॉ, ललित यादव, अवेश खान, अक्षर पटेल, तुषार देशपांडे, रिषभ पंत (विकेटकीपर), हर्षल पटेल, कीमो पॉल, एनरिच नॉर्टजे, डॅनियल सॅम्स, मार्कस स्टॉइनिस, संदीप लामिछाने, इशांत शर्मा, अजिंक्य रहाणे, रविचंद्रन अश्विन, शिखर धवन, शिमरॉन हेटमायर, अ‍ॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), मोहित शर्मा.