शिखर धवन आणि रोहित शर्मा (Photo Credit: File/PTI)

MI vs DC, IPL 2020 Qualifier 1: मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) सनरायझर्स हैदराबादविरुद्ध अचानक पुनरागमन केले असले तरी सध्या सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) सीझन 13च्या लीगच्या टप्प्यात झालेल्या दुखापतीमुळे 'हिटमॅन'ने आपली लय गमावली असे दिसले. आयपीएलच्या (IPL) लीग टप्प्यात संपूर्ण वर्चस्व दाखविल्यानंतर मुंबई इंडियन्स आयपीएल 2020च्या प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळवणारा पहिला संघ ठरला. अंतिम सामन्यात सनरायझर्स हैदराबादकडून मिळालेल्या पराभवानंतर रोहितच्या नेतृत्वात संघ गुरुवारी आयपीएल 2020 च्या फायनलचे तिकीट मिळवण्यासाठी मैदानावर उतरेल. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातील संघाच्या मुंबईविरुद्ध हाय-व्होल्टेज सामन्यापूर्वी, दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) सलामीवीर शिखर धवनने (Shikhar Dhawan) क्वालिफायर 1 मध्ये रोहितच्या कमजोरीचा फायदा उचलण्याबद्दल संकेत दिले. (Rohit Sharma Injury Update: रोहित शर्माने वादानंतर आपल्या दुखापतीवर दिले अपडेट, सांगितली संपूर्ण परिस्थिती)

धवन म्हणाला की, हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीतून सावरल्यानंतर रोहितला पुन्हा लय मिळविण्यास वेळ लागला तर गुरुवारी त्याचा संघ गुरुवारी आयपीएल 2020 पहिल्या क्वालिफायरमध्ये याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करेल. बुधवारी एका व्हर्च्युअल पत्रकारपरिषदेत माध्यमांशी बोलताना 34 वर्षीय धवनला विचारले गेले की, त्याचा संघ मागील काही सामन्यांना मुकलेल्या रोहितच्या स्थितीचा फायदा घेणार का? यावर 'गब्बर' म्हणाला की, “रोहित हा एक चांगला खेळाडू आहे, आणि तो बरेच सामने खेळलेला नाहीत त्यामुळे मला त्याच्याबद्दल खात्री नाही आणि आम्ही त्याचा नक्कीच फायदा घेऊ शकतो. त्याला माझा शुभेच्छा, पण विरोधक म्हणून आम्ही त्याचा निश्चितपणे फायदा घेऊ आणि त्यानुसार योजना तयार करू.”