MI Cape Town vs Paarl Royals 6th Match SA20 2025 Live Streaming: SA20 2025 चा सहावा सामना आज म्हणजेच 13 जानेवारी रोजी एमआय केप टाउन आणि पार्ल रॉयल्स (MI Cape Town vs Paarl Royals) यांच्यात खेळला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना केपटाऊनमधील न्यूलँड्स येथे खेळला जाईल. एमआय केपटाऊनने आतापर्यंत स्पर्धेत दोन सामने खेळले आहेत. ज्यामध्ये सनरायझर्सने ईस्टर्न केपविरुद्ध विजय मिळवला आणि जोबर्ग सुपर किंग्जविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. एमआय केपटाऊन संघ 5 गुणांसह पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, पार्ल रॉयल्सने स्पर्धेत एक सामना खेळला आहे. ज्यामध्ये सनरायझर्सने ईस्टर्न केपविरुद्ध विजय मिळवला. पार्ल रॉयल्सचा संघ पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. दोन्ही संघांमध्ये एक रोमांचक सामना पाहायला मिळतो.
सामना कधी खेळला जाईल?
एमआय केपटाऊन आणि पार्ल रॉयल्स यांच्यातील सहावा सामना आज सोमवारी 13 जानेवारी रोजी रात्री 9 वाजता न्यूलँड्स, केपटाऊन येथे खेळला जाईल. टॉसची वेळ त्यापूर्वी अर्धा तास असेल.ो
सामना कुठे पाहायचा?
SA20 2025 मध्ये एमआय केपटाऊन आणि पार्ल रॉयल्स यांच्यातील सहावा सामना भारतातील स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर थेट प्रक्षेपित केला जाईल. सामना डिस्ने+ हॉटस्टार अॅप आणि वेबसाइटवर लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे पाहू शकता.
दोन्ही संघांचे खेळाडू
पार्ल रॉयल्स संघ: लुआन-ड्रे प्रिटोरियस, मिशेल व्हॅन बुरेन, जो रूट, सॅम हेन, डेव्हिड मिलर (कर्णधार), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अँडिले फेहलुकवायो, ब्योर्न फोर्टुइन, लुंगी एनगिडी, क्वेना म्फाका, मुजीब उर रहमान, कीथ डजॉन, दयान गॅलिम, रुबिन हरमन, नकाबायोमेझी पीटर, कोडी युसेफ, दिवान मराईस
एमआय केपटाऊन संघ: कॉनर एस्टरहुइझेन (विकेटकीपर), रशीद खान (कर्णधार), रसी व्हॅन डर ड्यूसेन, रीझा हेंड्रिक्स, कॉलिन इंग्राम, डेवाल्ड ब्रुविस, जॉर्ज लिंडे, अझमतुल्ला उमरझाई, डेलानो पॉटगीटर, कागिसो रबाडा, ट्रेंट बोल्ट, कॉर्बिन बॉश, डेन पिएड्ट, थॉमस काबर, रायन रिकेल्टन, नुवान तुषारा, ख्रिस बेंजामिन, ट्रिस्टन लुस