Melbourne Stars vs Sydney Sixers 28th Match Big Bash League 2024-25 Live Streaming: बिग बॅश लीग 2024-25 चा 28 वा सामना आज म्हणजेच 9 जानेवारी रोजी मेलबर्न स्टार्स आणि सिडनी सिक्सर्स यांच्यात खेळला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना मेलबर्नमधील मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळला जाईल. मेलबर्न स्टार्सने आतापर्यंत स्पर्धेत 7 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये संघाला 2 जिंकता आले तर 4 सामने हरले आहेत. पॉइंट टेबलमध्ये, मेलबर्न स्टार्स संघ 4 गुणांसह शेवटच्या स्थानावर म्हणजेच आठव्या स्थानावर आहे. दुसरीकडे, सिडनी सिक्सर्सने स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. सिडनी सिक्सर्सने स्पर्धेत 6 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये 4 विजयी, 1 पराभव आणि एक सामना अनिर्णीत राहिला. सिडनी सिक्सर्स संघ पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे. दोन्ही संघांमध्ये एक रोमांचक सामना पाहायला मिळतो. (हेही वाचा: IND vs ENG T20I Series 2025: टीम इंडिया-इंग्लंडमधील टी 20 मालिका होणार धमाकेदार; हेड टू हेड रेकॉर्डची आकडेवारी घ्या जाणून)
सामना कधी खेळला जाईल?
मेलबर्न स्टार्स आणि सिडनी सिक्सर्स यांच्यातील बिग बॅश लीग 2024-25 चा 28 वा सामना आज बुधवारी 9 जानेवारी रोजी दुपारी 1:45 वाजता मेलबर्नमधील मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळला जाईल. तर टॉसची वेळ त्यापूर्वी अर्धा तास असेल.
सामना कुठे पाहू शकता?
बिग बॅश लीग 2024-25 मधील मेलबर्न स्टार्स आणि सिडनी सिक्सर्स यांच्यातील 28 वा सामना भारतातील स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर थेट प्रक्षेपित केला जाईल. याशिवाय, तुम्ही डिस्ने+ हॉटस्टार अॅप आणि वेबसाइटवर लाईव्ह स्ट्रीमिंगचा आनंद घेऊ शकता.
दोन्ही संघांचे खेळाडू
मेलबर्न स्टार्स संघ: सॅम हार्पर (विकेटकीपर), मार्कस स्टोइनिस (कर्णधार), थॉमस फ्रेझर रॉजर्स, बेन डकेट, डॅनियल लॉरेन्स, ग्लेन मॅक्सवेल, हिल्टन कार्टराईट, ओसामा मीर, जोएल पॅरिस, मार्क स्टेकेटी, पीटर सिडल, जोनाथन मेर्लो, डग वॉरेन, ब्यू वेबस्टर
सिडनी सिक्सर्स संघ: जोश फिलिप (विकेटकीपर), मोइसेस हेन्रिक्स (कर्णधार), जेम्स व्हिन्स, कुर्टिस पॅटरसन, जॉर्डन सिल्क, जॅक एडवर्ड्स, हेडन केर, शॉन अॅबॉट, बेन द्वारशिस, अकील होसेन, टॉड मर्फी, जोएल डेव्हिस, मिशेल पेरी, लाचलन. शॉ