Mayank Yadav: 'स्पीड गन' मयंक यादव अनफीट,  मॅचच्या काही तासाआधी LSG ला मोठा धक्का
Mayank Yadav (Photo credit - X)

आज लखनौ सुपर जायंट्‌स‌ आणि दिल्ली कॅपिटल्स दरम्यान लखनौत लढत रंगणार आहे. आयपीएलच्या यंदाच्या मोसमात लखनौलाच नव्हे तर भारताला युवा वेगवान गोलंदाज गवसला आहे. मयंक यादव हे त्याचे नाव. ताशी 150 किलोमीटरच्या वेगाने तो सातत्याने गोलंदाजी करीत आहे; पण गुजरातविरुद्धच्या लढतीत दुखापतीमुळे त्याला माघारी जावे लागले. या लढतीत तो एकच षटक टाकू शकला. दिल्लीविरुद्धच्या लढतीतही त्याचा तो खेळणार नसल्याने लखनौ सुपर जायंटसला मोठा धक्का बसला आहे.  पुढील दोन सामने मयंक यादव हा संघात नसणार आहे.  (हेही वाचा - LSG vs DC Head to Head: लखनौ सुपर जायंट्‌स‌समोर दिल्ली कॅपिटल्सचे आव्हान, आकडेवारीत कोणाचे आहे वर्चस्व; घ्या जाणून)

मयंक यादवच्या अनुपस्थितीत लखनौला इतर गोलंदाजांवर अवलंबून राहावे लागणार आहे. नवीन उल हक, यश ठाकूर, कृणाल पंड्या व रवी बिश्‍नोई या गोलंदाजांना दिल्लीच्या फलंदाजांना बांधून ठेवावे लागणार आहे. यश ठाकूर याने गुजरातविरुद्धच्या लढतीत 30 धावा देत पाच फलंदाज बाद केले. लखनऊचा सामना आज दिल्ली कॅपिटल्सशी होईल आणि त्यानंतर ते 14 एप्रिलला कोलकातामध्ये खेळणार आहे. लखनौचे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी 19 एप्रिल रोजी चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात मयंक पूर्णपणे तंदुरुस्त होईल, अशी आशा व्यक्त केली आहे.

"गुजरात विरुद्धच्या सामन्यात एक ओव्हर टाकल्यानंतर त्याला हिप स्टिफनेसची समस्या जाणवली. यानंतर आम्ही त्यांची एमआरआय चाचणी केली, ज्यामध्ये थोडी सूज दिसून आली. तो लवकरच मैदानावर परत येईल अशी आम्हाला आशा आहे."  असे लखनौचे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी सांगितले.