Most Catches as Wicketkeeper in IPL: आयपीएलमध्ये सर्वाधिक झेल घेणाऱ्या यष्टीरक्षकांच्या यादीत महेंद्रसिंह धोनी दुसऱ्या क्रमांकावर; अव्वल स्थानी कोण? घ्या जाणून
CSK कर्णधार एमएस धोनी (Photo Credit: PTI)

क्रिकेटच्या खेळात यष्टिरक्षक मोलाची भूमिका बजाबत असतो. झेल पकडण्यापासून ते यष्टिचित करण्यापर्यंत यष्टीरक्षकाला नेहमी तयार असावे लागते. मैदानात असताना एकाच वेळी बऱ्याच गोष्टी कराव्या लागत असल्यामुळे यष्टीरक्षकाला नेहमी सावध राहणे गरजेचे असते. क्रिकेटच्या इतिहासात भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने (Mahendra Singh Dhoni) यष्टीमागून राहून अनेक व्रिक्रमाला गवसणी घातली आहे. मात्र. आयपीएलमध्ये सर्वाधिक झेल घेणाऱ्या यष्टीरक्षकांच्या यादीत महेंद्रसिंह धोनी दुसऱ्या क्रमांकावर आहे. यामुळे पहिल्या क्रमाकांवर कोणता खेळाडू आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

इंडियन प्रीमियर लीग ही एकमेक अशी स्पर्धा आहे, जिथे प्रत्येक विभागात सर्वोत्कृष्ट खेळाडू खेळताना दिसतात. आयपीएलमध्येही फलंदाज आणि गोलंदाजांसह यष्टीरक्षकांची भूमिका देखील खूप महत्वाची ठरली आहे. त्यांनी आपल्या शानदार यष्टिरक्षणाद्वारे संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले आहे. या लेखामध्ये तुम्हाला 2 दिग्गज यष्टिरक्षकांबद्दल सांगू ज्यांनी या स्पर्धेत यष्टीरक्षण करताना 100 झेल घेतले आहेत. हे देखील वाचा- How To Download Hotstar & Watch RR Vs MI Live Match: राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना पाहण्यासाठी हॉटस्टार डाउनलोड कसे करावे? इथे पाहा

आयपीएलमध्ये सर्वाधिक झेल घेणारे यष्टिरक्षक-

1) महेंद्रसिंह धोनी-

चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीला जगातील दिग्गज यष्टीरक्षकांच्या यादीत गणले जाते. मात्र, आयपीएलमध्ये यष्ट्यांमागे सर्वाधिक झेल पकडण्याच्या बाबतीत तो दुसर्‍या क्रमांकावर आहे. महेंद्रसिंह धोनीने आयपीएलच्या 195 सामन्यात विकेटच्या मागे राहून 100 झेल घेतले आहेत.

2) दिनेश कार्तिक-

कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार दिनेश कार्तिकने आयपीएलमध्ये सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम स्वत:च्या नावावर केला आहे. दिनेश कार्तिकने आयपीएलमधील 186 सामन्यांमध्ये आतापर्यंत यष्टीमागे 111 झेल आहेत.

महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वात चेन्नईच्या संघाने आतापर्यंत 3 आयपीएलचे किताब आपल्या नावावर केले आहेत. तर, कोलकाताच्या संघाचे नेतृत्व करणारा दिनेश कार्तिकला आपल्या संघासाठी एकही आयपीएलचे किताब जिंकता आले नाही. परंतु, गौतम गंभीरच्या नेतृत्वात कोलकाताच्या संघाने दोन वेळा आयपीलच्या किताब जिंकले आहेत.