How To Download Hotstar & Watch RR Vs MI Live Match: राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना पाहण्यासाठी हॉटस्टार डाउनलोड कसे करावे? इथे पाहा
Rajastan Royals Vs Mumbai Indians (Photo Credit: Twitter)

RR Vs MI 20th IPL Match 2020: आयपीएलच्या तेराव्या हंगामातील 20व्या सामन्यात राजस्थान रॉयल आणि मुंबई इंडियन्स (Rajasthan Royals Vs Mumbai Indians) आज एकमेकांशी भिडणार आहेत. आबूधाबीतील शेख जायद स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. राजस्थानच्या संघाचे नेतृत्व स्वीव्ह स्मिथ करत आहेत. तर, मुंबई इंडियन्स संघाचे कर्णधार पद रोहित शर्मा संभाळत आहे. आयपीएलच्या गुणतालिकेत राजस्थानचा संघ पाचव्या तर, मुंबईचा संघ पहिल्या क्रमांकावर आहे. आजच्या सामना राजस्थानच्या संघासाही महत्वपूर्ण ठरणार आहे.

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेली आयपीएल यंदा भारताऐवजी युएईमध्ये खेळवला जात आहे. जर तांत्रिक अडणींनीमुळे तुम्ही टी.व्ही पाहता येत नसेल तर, चिंता करण्याची गरज नाही. आपण डिस्नी+ हॉटस्टारवर आयपीएल लाइव्ह पाहू शकतात. डिस्नी+ हॉटस्टार यावर्षी आयपीएलचा स्ट्रीमिंग पार्टनर आहे. अशा स्थितीत, डिस्नी+ हॉटस्टारवर रॉयल राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात रंगणारा आजचा सामनादेखील पाहता येणार आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजेपासून लाईव्ह प्रक्षेपित केला जाईल. हे देखील वाचा- RR vs MI Dream11 Team Prediction IPL 2020: ड्रिम 11 गेम खेळताय? मग राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्यात करा 'या' खेळाडूंची निवड

हॉटस्टार डाउनलोड करण्याची पद्धत-

- प्रथम, आपल्या मोबाईमधील इंटरनेट सुरु करा आणि प्ले- स्टोर उघडून हॉटस्टार ऍप शोधा.

- यानंतर इन्स्टॉल ऑप्शनवर जाऊन हॉटस्टार ऍप आपल्या फोनमध्ये इन्स्टॉल करा.

- इन्स्टॉल केल्यानंतर, आपल्या मोबाईलच्या मेनूमध्ये किंवा मुख्यपृष्ठावर हॉटस्टार अ‍ॅप चिन्ह दिसेल.

- यानंतर आपण आपल्या जीमेल किंवा फेसबुक अकाउंटवरून साइन इन करून किंवा आवश्यक तपशील देऊन अ‍ॅप उघडू शकतात.

- साइन इन होताच आपण लाईव्ह व्हिडिओ, क्रीडा टूर्नामेंट जसे की आयपीएल, टीव्ही मालिका, चित्रपट आणि बरेच काही हॉटस्टार वर पाहता येणार आहे.

हिंदी, इंग्रजी, बंगाली, तामिळ, पंजाबी अशा बर्‍याच भाषांमध्ये हॉटस्टार उपलब्ध आहे. टीव्ही मालिका, बातम्या, चित्रपट यासह हॉटस्टारवर 1 लाख तासांपर्यंतची व्हिडीओ कन्टेन्ट उपलब्ध आहे.