RR vs MI Dream11 Team Prediction IPL 2020: ड्रिम 11 गेम खेळताय? मग राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्यात करा 'या' खेळाडूंची निवड
Jos Buttler (Photo Credits: IANS)

आयपीएलच्या (IPL 13) तेराव्या हंगामातील 20वा राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स ( Rajasthan Royals Vs Mumbai Indians) यांच्यात आज आबुधाबी येथील शेख जायद मैदानात खेळला जाणार आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्स संघ आणखी एका विजयासाठी मैदानात उतरणार आहे. तर, राजस्थानचा संघ सलग दोन सामन्यात मिळालेल्या पराभवावर पूर्णविराम लावण्याचा प्रयत्न करणार आहे. यामुळे आजचा सामना ड्रीम 11 (Dream11) वर गेम खेळणाऱ्या सर्वांसाठीच महत्वाचा ठरणार आहे. आजच्या सामन्यात कोणकोणत्या खेळाडूंची निवड करणे योग्य ठरेल? यासाठी खालील माहिती फायदेशीर ठरणार आहे.

सघ्या अनेकांमध्ये ड्रीम 11 गेमचे वेड पाहायला मिळत आहे. यामुळे कोणता खेळाडू आपल्याला अधिक गुण मिळवून देईल? याकडे अधिक लक्ष दिले जाते. आजचा सामना राजस्थान आणि मुंबईच्या संघात पार पडणार आहे. दोन्ही संघातील खेळाडू सध्या फॉर्म मध्ये दिसत आहे. यामुळे ड्रीम 11 मध्ये अकरा खेळाडूंची निवड करणे थोडे कठिण होणार आहे. तर, आजच्या सामन्यात अधिक गुण मिळवून देण्याची शक्यता असलेले खेळाडू कोणकोणते जाणून घेऊया. हे देखील वाचा- RR Vs MI 20th IPL Match 2020 Live Streaming: राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Hotstar आणि Star Network वर

खेळाडू-

यष्टीरक्षक- संजू सॅमसन, क्विंटन डिकॉक,

फलंदाज- रोहित शर्मा, स्टीव्ह स्मिथ, रॉबिन उथप्पा

अष्टपैलू खेळाडू- हार्दिक पांड्या, कायरन पोलार्ड, बेन स्टोक्स

गोलंदाज- जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, जेम्स पॅटिनसन,

पूर्ण संघ-

मुंबई इंडियन्सः रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डीकॉक (यष्टीरक्षक), ईशान किशन, किरोन पोलार्ड, हार्दिक पांड्या, क्रुणाल पंड्या, जेम्स पॅटिनसन, राहुल चहर, ट्रेंट बाउल्ट, जसप्रीत बुमराह

राजस्थान रॉयल्स: जोस बटलर (यष्टीरक्षक), यशस्वी जैस्वाल, रॉबिन उथप्पा, संजू सॅमसन, स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), रियान पराग, महिपाल लोमरोर, टॉम करन, राहुल तेवतिया, जोफ्रा आर्चर, श्रेयस गोपाळ, जयदेव उनाडकट, वरुण आरोन