Sandeep Patil (Photo Credits: Getty Images)

भारताचे माजी क्रिकेटपटू आणि भारतीय क्रिकेट संघ निवड समिती अध्यक्ष संदीप पाटील (Sandeep Patil) यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार दिली आहे. संदीप पाटील यांचे फेक फेसबुक अकाऊंट (Fake Facebook Account) तयार करुन अज्ञाताने अनेक क्रिकेटपटूंकडे त्यांचे नंबर मागितले. तसेच, त्यांना इतरही काही मेसेज केले. हा प्रकार उघडकीस येताच पाटील यांनी पोलिसांत धाव घेतली. पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात व्यक्तिवरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुंबई पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात भारतीय दंड संहिता कलम 66(C) (विश्वासघात, एखाद्याच्या नावाचा गैरवापर करणे) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. मुंबई पोलीस (Mumbai Police) पुढील तपास करत आहेत.

संदीप पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, आपण सोशल मीडयाचा वापर करत नाही. तसेच, माझे फेसबुक, ट्विटर अथवा इतर कोणत्याही प्रकारचे सोशल मीडिया अकाऊंट नाही. मात्र, माझ्या एका सहकाऱ्याने माझ्याशी संपर्क करुन मला विचारले की, मी क्रिकेटटपुंचे क्रमांक का मागत आहे. या विचारणेनंतर मला समजले की, कोणी व्यक्ती माझ्या नावाचा चुकिच्या पद्धतीने वापर करत आहे. या प्रकाराची मी पोलिसांना माहिती दिली आहे.

दरम्यान, आपल्या नावाचा कोणीतरी दुरुपयोग करत असल्याचे समजताच संदीप पाटील यांनी तातडीने बीसीसीआय आणि मुंबई पोलीस यांच्याशी संपर्क साधला आणि घडल्या प्रकाराची माहिती दिली. माजी क्रिकेटपटू आनंद यल्विगी यांनीही 25 ऑगस्ट रोजी पाटील यांच्या फेक अकाऊंटबाबत माहिती दिली होती.

आनंद यल्विगी यांनी म्हटले होते की, मला फेसबुक अकाउंटवरुन रिक्वेस्ट आली आहे. ज्यात 13 लोकांना म्युच्यूअल फ्रेड्सच्या यादीत दाखवले जात आहे. मी रिक्वेस्ट स्वीकारताच हे बनावट अकाऊंट चालवणाऱ्या व्यक्तिने माझ्यासोबत चॅट करण्यास सुरुवात केली. त्याने मला विचारले की, मला बीसीसीआयचे एक्टिंग सेक्रेटरी अमिताभ चौधरी यांचा मिळेल काय. मला ही गोष्ट संशयास्पद वाटली. मी तातडीने पाटील यांच्याशी संपर्क केला. मात्र, पाटील यांनी आपण कोणालाही नंबर मागितला नसल्याचे सांगितले. पण, ते असेही म्हणाले की, मी फेसबुकवरुन आपल्याशी संपर्कच केला नाही. त्यानंतर मी हे अकाऊंट ब्लॉक केले. (हेही वाचा, IND vs WI 1st Test: विराट कोहली याने मोडला सौरव गांगुली याचा सर्वात मोठा रेकॉर्ड, एमएस धोनी याच्याशी साधली बरोबरी, वाचा सविस्तर)

एएनआय ट्विट

दरम्यान, अज्ञात आरोपीने क्रिकेट समालोचक गौतम भीमनी यांच्याशीही संपर्क केला. त्याने त्यांना माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्या संपर्क क्रमांक मागितला. तो सातत्याने नंबर देण्यासाठी माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, समोरच्या व्यक्तीच्या संशयास्पद वर्तनावरुन मी मी सतर्क झालो, असेही भीमनी यांनी सांगितले.