
Punjab Kings vs Delhi Capitals, TATA IPL 2025 58th Match: इंडियन प्रीमियर लीग 2025 चा 58 वा सामना आज म्हणजेच 08 मे रोजी पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (PBKS vs DC) यांच्यात धर्मशालातील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवण्यात येईल. या हंगामात, दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व अक्षर पटेल करत आहे. तर, पंजाब किंग्जची कमान श्रेयस अय्यरच्या खांद्यावर आहे. पंजाब किंग्जचा संघ उत्तम फॉर्ममध्ये आहे आणि 11 सामन्यांत सात विजयांसह पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी दिल्ली कॅपिटल्ससाठी आजचा सामना 'करो या मरो' असा आहे. जर दिल्लीचा आज पराभव झाला तर त्यांचे प्लेऑफमध्ये खेळण्याचे स्वप्न जवळजवळ संपुष्टात येईल. दरम्यान, पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11
दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): फाफ डू प्लेसिस, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), केएल राहुल, समीर रिझवी, अक्षर पटेल (क), ट्रिस्टन स्टब्स, माधव तिवारी, मिचेल स्टार्क, दुष्मंथा चमीरा, कुलदीप यादव, टी नटराजन.
पंजाब किंग्स (प्लेइंग इलेव्हन): प्रभसिमरन सिंग, प्रियांश आर्य, जोश इंग्लिस (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहल वढेरा, शशांक सिंग, मार्कस स्टॉइनिस, मार्को जॅनसेन, अजमातुल्ला ओमरझाई, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग