टीम इंडियाविरुद्ध विशाखापट्टणम स्टेडियममध्ये सुरु असलेल्या मॅचमध्ये विंडीज संघाचा 108 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. भारताने दिलेल्या 388 लक्ष्याचा पाठलाग करताना विंडीजला 280 धावाच करता आल्या. या सामन्यात विजय मिळवत भारतीय संघाने 3 सामन्यांच्या मालिकेत विंडीजसह 1-1 ने बरोबरी केली आहे.

कुलदीप यादवने वेस्ट इंडिजविरुद्ध हॅटट्रिक घेतली. कुलदीपने शाई होप, जेसन होल्डर आणि अलझारी जोसेफ यांना बाद केले आणि वनडे क्रिकेटमधील दुसरी हॅटट्रिक घेतली.  होपने 78, होल्डर 11 आणि जोसेफ शून्यावर बाद झाला. 

निकोलस पूरनला बाद केल्यावर मोहम्मद शमीने पुढील चेंडूवर विंडीज कर्णधार किरोन पोलार्ड याला पहिल्याच चेंडूवर पॅव्हिलिअनचा मार्ग दाखवला. यासह विंडीजने 192 धावांवर पाचवी विकेट गमावली. 

मोहम्मद शमी ने भारताला चौथे यश मिळवून दिले. निकोलस पूरन 75 धावा करून बाद झाला. शमीचा शॉर्ट चेंडू पूल करण्याच्या प्रयत्नातपूरन कुलदीप यादव कडे झेलबाद झाला. 

भारताने दिलेल्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करत असलेल्या विंडीजच्या 150 धावा पूर्ण झाल्या आहेत. विंडीजने 26 ओव्हरमध्ये 161 धावांवर 3 गडी गमावले आहेत. शेप होप 70 आणि निकोलस पूरन 47 धावांवर खेळत आहेत. 

रवींद्र जडेजाच्या तिसऱ्या चेंडूवर निकोलस पूरनने हवेत शॉट मारला. यावेळी कॅचची संधी होती, पण, दीपक चाहर कडून कॅच सुटला आणि पूरनला जीवदान मिळाले. यावर विराट कोहली आणि रवींद्र जडेजा चिडले. 

शाई होपने 59 चेंडूंत 15 वे एकदिवसीय अर्धशतक पूर्ण केले. या कॅलेंडर वर्षात, होपने 12 व्या वेळी 50 हून अधिक धावा केल्या आहेत. या फलंदाजाने ब्रायन लाराला मागे सोडले आहे. विव्हियन रिचर्ड्सने 13 वेळा हे पराक्रम केले आहेत. यानंतर वेस्ट इंडीजचे 100 धावा 20.5 षटकांत पूर्ण केल्या. 

भारतीय संघाचा अनुभवी फिरकीपटू रवींद्र जडेजाने कॅरेबियन फलंदाज रोस्टन चेसला 4 च्या वैयक्तिक धावांवर बाद टीम इंडियाला तिसरे यश मिळवून दिले. चेसने आज नऊ चेंडूत चार धावा केल्या.

14 व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर वेस्ट इंडिजला दुसरा झटका बसला. चेन्नई मॅचमधील शतकवीर शिमरोन हेटमेयर श्रेयस अय्यरच्या अप्रतिम फील्डिंगचा शिकार बनला. अय्यरने अचूक निशाणा लावत हेटमेयरला धावबाद केले. 

11 व्या ओव्हरज्या अंतिम चेंडूवर शार्दूल ठाकूर ने भारताला पहिले यश मिळवून दिले. शार्दूलने 30 धावांवर एव्हिन लुईसला पॅव्हिलिअनचा मार्ग दाखवला. 

Load More

भारत (India) आणि वेस्ट इंडीज (West Indies) यांच्यातील 3 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा वनडे सामना आज विशाखापट्टणम (Visakhapatnam) मध्ये होणार आहे. आणि आजचा सामना भारतीय संघासाठी करो-या-मारोचा सामना आहे. रविवारी चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियममध्ये झालेल्या मालिकेतील पहिल्या सामन्यात विंडीज संघाने यजमान संघाला जोरदार झटका दिला. विंडीज संघाने फलनादजीने शानदार प्रदर्शन करत टीम इंडियाला धूळ चार्ली. चेन्नईतील वनडे सामना जिंकत विंडीजने मालिकेत 0-1 ने आघाडी घेतली. त्यामुळे, आजच्या सामन्यात भारतीय संघाकडून एक चूक आणि त्यांनी मालिका गमावली. आजपर्यंत भारतीय संघाने (Indian Team) घरच्या मैदानावर खेळत सलग पाच वनडे सामने कधीही गमावले नाहीत. भारतीय गोलंदाजी चेन्नईमध्ये विखुरलेली दिसत होती. भारताने सहा गोलंदाजांचा वापर केला, परंतु निकाल अनुकूल आला नाही. आजच्या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेयिंग इलेव्हनमध्ये काही बदल होतात कि नाही यावर सर्वांचे लक्ष लागून असेल. (मॅचचा लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा)

टीम इंडियासाठी आनंदजी बातमी म्हणजे श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत फॉर्ममध्ये परतले आहे. मागील सामन्यात दोन्ही फलंदाजांनी अपेक्षित अशी फलंदाजी केली आणि संघाला कठीण स्थितीतून बाहेर काढले. आजच्या मॅचसाठीदेखील त्यांच्याकडून अशाच खेळीची अपेक्षा असेल. पण, विंडीजच्या फलंदाजांनी पहिल्या मॅचमध्ये केलेली फलंदाजी पाहून त्यांना हल्ल्यात घेतले जाऊ शकत नाही. दुसरीकडे, विंडीजला त्यांच्या गोलंदाजीत सुधार करण्याची गरज आहे. मागील सामन्यात विंडीज गोलंदाजांनी निराश केले. सुरुवातीला काही विकेट घेतल्यावर गोलंदाजांना विकेटसाठी संघर्ष करावा लागला. टीम इंडियाकडे शानदार फलंदाजांची लाईन आहे, त्यामुळे ते मोठा स्कोर करण्यातही सक्षम आहे. विंडीज आजचा सामना जिंकून घरच्या मैदानावरील झालेल्या पराभवाचा बदल घेऊ इच्छित असतील.

असा आहे भारत आणि वेस्ट इंडिज संघ:

भारत: रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली (कॅप्टन), श्रेयस अय्यर, रिषभ पंत, रवींद्र जडेजा, मयंक अग्रवाल, मनीष पांडे, शिवम दुबे, केदार जाधव, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चाहर, मोहम्मद शमी आणि शार्दूल ठाकूर.

वेस्ट इंडिज: सुनील अंब्रिस, शाई होप, खारी पियरे, रोस्टन चेझ, अलज़ारी जोसेफ, कीरोन पोलार्ड (कॅप्टन), शेल्डन कोटरेल, ब्रँडन किंग, निकोलस पूरन, शिमरॉन हेटमेयर, एव्हिन लुईस, रोमारियो शेफर्ड, जेसन होल्डर, कीमो पॉल आणि हेडन वॉल्श जूनियर.