पहिले फलंदाजी करत टीम इंडियाने दिलेल्या 297 धावांच्या प्रत्युत्तरात किवी संघाने 46. ओव्हरमध्ये 5 विकेटने विजय मिळवला. मार्टिन गप्टिल, हेन्री निकोल्स यांच्या अर्धशतक आणि अखेरच्या ओव्हरमध्ये टॉम लाथम यांच्या फटकेबाजीच्या जोरावर किवी संघाने विजय मिळवला आणि मालिकेत टीम इंडियाचा क्लीन स्वीप केला. टॉम लाथम आणि कॉलिन डी ग्रैंडहोम यांनी अनुक्रमे नाबाद 32 आणि 58 धावा करत संघाचा विजय निश्चित केला.
IND vs NZ 3rd ODI Highlights: तिसऱ्या वनडेसह न्यूझीलंडने जिंकली वनडे मालिका, टीम इंडियाचा 3-0 ने केला क्लीन स्वीप
44 षटकांनंतर पाच गडी गमावून किवी संघाची धावसंख्या 265 धावा आहे. विजयासाठी अद्याप संघाला 36 चेंडूत 32 धावांची गरज आहे.
युजवेंद्र चहलने भारतालापाचवे यश मिळवून दिले. चहलने ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर जिमी नीशमला विराट कोहलीकडे कॅच केले. नीशम चहलचा तिसरा बळी बनला. 25 चेंडूत 19 धावा करून नीशम परतला.
न्यूझीलंडने चार विकेट गमावून 36 ओव्हरमध्ये 207 धावा केल्या. टॉम लाथम 10 आणि जिमी नीशम 12 धावा करून खेळत आहे. किवी संघाला तिसरा सामना जिंकून क्लीन स्वीप पूर्ण करण्यासाठी 84 चेंडूत 90 धावांची गरज आहे.
भारताला 32.5 षटकांतचौथे यश मिळाले. शार्दुल ठाकूरच्या चेंडूवर यष्टीरक्षक केएल राहुलने हेन्री निकोल्सचा झेल टिपला. निकोल्स 103 चेंडूंत 9 चौकारांसह 80 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला. नवा फलंदाज जिमी नीशम दाखल झाला आहे.
रवींद्र जडेजाने भारताला तिसरे यश मिळवून. जडेजाने ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर धोकादायक रॉस टेलरला कॅप्टन विराट कोहलीकडे कॅच आऊट केले. पहिल्या सामन्यात शतक आणि दुसऱ्यात अर्धशतक करणारा टेलर आज 18 चेंडूत 12 धावा करून माघारी परतला.
न्यूझीलंडच्या डावातील 30 ओव्हर संपले आहेत. न्यूझीलंडने दोन विकेट गमावून 175 धावा केल्या. हेन्री निकोल्स आणि रॉस टेलर धावा करून खेळत आहे. न्यूझीलंडचा विजय जवळपास निश्चित दिसत आहे. त्यांना आता 20 ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी 122 धावांची गरज आहे, शिवाय त्यांच्याकडे 8 विकेटदेखील शिल्लक आहे.
युजवेंद्र चहल ने भारताला दुसरे यश मिळवून दिले. 21 च्या वैयक्तिक स्कोरवर किवी कर्णधार केन विल्यमसन मयंक अग्रवालकडे कॅच आऊट झाला. यासह चहलने हेन्री निकोल्स आणि विल्यमसनमधील अर्धशतकी भागीदारी मोडली.
टीम इंडियाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना यजमान संघ न्यूझीलंडने 26.1 षटकांत एक गडी गमावून 150 धावा पूर्ण केल्या आहेत. कर्णधार केन विल्यमसन 21 आणि हेन्री निकोल्स 60 धावा करून खेळत आहे.
25 ओव्हरचा खेळ संपला आहे आणि न्यूझीलंड संघाने भारताच्या 297 धावांच्या प्रत्युत्तरात एक विकेट गमवून 149 धावा केल्या आहे. केन विल्यमसन 21 आणि हेन्री निकोल्स 59 धावा करून खेळत आहे यजमान किवी टीम इंडियाला जिंकण्यासाठी 150 चेंडूत 153 धावांची गरज आहे.
किवी सलामीवीर हेनरी निकोल्स ने शानदार फलंदाजी करत आपल्या आंतरराष्ट्रीयवनडे कारकीर्दीचे 11 वे अर्धशतक पूर्ण केले. निकोल्स सध्या 72 चेंडूच्या मदतीने पाच चौकार ठोकत 50 धावा करून खेळत आहे.
युझवेंद्र चहलने 17 व्या षटकात भारताला आवश्यक विकेट मिळवून दिली. षटकांच्या तिसर्या चेंडूवर चहलने किवी सलामी फलंदाज मार्टिन गप्टिलला बोल्ड केले. 46 चेंडूत 66 धावा करून गप्टिल माघारी परतला.
भारताने दिलेल्या 297 धावांच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंड सलामी जोडीने चांगली सुरुवात केली. 15 ओव्हरचा खेळ संपला असून किवी टीमने एकी विकेट न गमावता 103 धावा केल्या आहेत. मार्टिन गप्टिल 65 आणि हेन्री निकोल्स 35 धावा करून खेळत आहे. ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर निकोल्सने चौकार मारला आणि 100 धावा पूर्ण केल्या.
किवी सलामी जोडी मार्टिन गप्टिल आणि हेन्री निकोल्सने भारताविरुद्ध चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली. यादरम्यान गप्टिलने 29 चेंडूत 37 वे वनडे अर्धशतक पूर्ण केले. गप्टिलने या डावात 6 चौकार आणि 4 षटकार मारले.
भारताने दिलेल्या 297 धावांच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडच्या पहिल्या दहा ओव्हर संपल्या आहेत आणि यजमान टीमने एकही विकेट न गमावता धावा केल्या. न्यूझीलंडकडून मार्टिन गप्टिल 43 आणि हेन्री निकोल्स 20 धावा करून खेळत आहे.
भारताने दिलेल्या 297 धावांच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडसाठी चांगली सुरुवात. पाच षटकांनंतर त्याने कोणतीही विकेट न गमावता 10 धावा केल्या आहेत. मार्टिन गप्टिल 17 आणि हेन्री निकोल्स 7 धावा करून खेळत आहे.
वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने भारतीय संघासाठी पहिला ओव्हर टाकली. बुमराहच्या या षटकात किवी फलंदाजांनी एक चौकार आणि तिहेरीच्या मदतीने एकूण सात धावा केल्या. एका ओव्हरनंतर एकही विकेट न गमावता न्यूझीलंडने सात धावा केल्या. मार्टिन गुप्टिल 7 आणि हेन्री निकोल संघाकडून 0 धावा करत आहेत.
टॉस गमावून पहिले फलंदाजी करत टीम इंडियाने केएल राहुल याचे शतक आणि श्रेयस अय्यर याच्या अर्धशतकाच्या जोरावर निर्धारित ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 296 धावा केल्या आणि न्यूझीलंडसमोर क्लीन स्वीप टाळण्यासाठी 297 धावांचे लक्ष्य दिले. भारताकडून राहुलने 112 धावा, श्रेयस 62 आणि मनीष पांडे 42 धावा केल्या. दुसरीकडे, न्यूझीलंडकडून हमीश बेनेट 4, काईल जैमीसन, आणि जेम्स नीशम यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
हमीश बेनेटने शार्दुल ठाकूरला ओव्हरच्या दुसर्या बॉलवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. ठाकूरने फुल टॉस बॉलवर शॉट खेळला पण कॉलिन डी ग्रैंडहोमने त्याला झेलबाद केले. सहा चेंडूत सात धावा करून शार्दूल परतला.
हमीष बेनेटने न्यूझीलंडला दोन मोठ्या विकेट्स मिळवून दिल्या. केएल राहुल आणि मनीष पांडेची डोकादायक भागीदारी त्याने मोडली आणि सलग दोन चेंडूवर दोघांना परतीचा मार्ग दाखवला. राहुल 112 आणि मनीषने 42 धावा केल्या.
केएल राहुल ने न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या वनडे सामन्यात शानदार फलंदाजी केली आणि मालिकेतील पहिले, तर कारकिर्दीतील 4 थे वनडे शतक ठोकले. या खेळी दरम्यान राहुलने 9 चौकार आणि 1 षटकार मारला.
पाचव्या स्थानावर फलंदाजीला आलेला केएल राहुल मालिकेतील पहिल्या शतकाच्या जवळ पोहचला आहे. राहुल 43 ओव्हरनंतर 99 चेंडूत 92 धावा करून खेळत आहे.
कायल जैमिसनच्या षटकांच्या चौथ्या चेंडूवर केएल राहुल आणि मनीष पांडे यांनी अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. दोघांनी 49 चेंडूत 50 धावा केल्या आहेत. ही भागीदारी भारतासाठी खूप महत्वाची आहे.
टीम इंडियाचा डाव हळूहळू सावरत आहे. 37 ओव्हरमध्ये त्यांनी 200 धावा पूर्ण केल्या. भारतीय संघाने 37 षटकांनंतर चार गडी गमावून 204 धावा केल्या आहेत. सध्या मनीष पांडे 20 आणि राहुल 68 धावा करून खेळत आहे. भारतासाठी आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यासाठी दोघांचे टिकून खेळणे आवश्यक आहे.
या खेळपट्टीनुसार भारताला 280 ची धावसंख्या करावी लागेल, यासाठी सामना संपण्यापर्यंत मनीष पांडे आणि केएल राहुलला क्रीजवर टिकून राहणे आवश्यक आहे.
32 व्या षटकातील पाचव्या चेंडूवर दोन धावा घेऊन केएल राहुलने आपले अर्धशतक पूर्ण केले. या मालिकेतील हे त्याचे दुसरे अर्धशतक आहे. राहुलने 66 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले.
जिमी निशामने श्रेयस अय्यरला कॉलिन डी ग्रैंडहोमकडे कॅच आऊट करून भारताला मोठा झटका दिला. श्रेयस आज 63 चेंडूत 62 धावा करून माघारी परतला. यापूर्वी त्याने केएल राहुलसह शतकी भागीदारी करत भारताचा डाव सावरला. निशामच्या चेंडूवरग्रैंडहोमने पुढे डाइव्ह मारत जबरदस्त कॅच पकडला. त्याच्या खेळीत त्याने नऊ चौकार ठोकले.
बे ओव्हल मैदानावर नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 29 षटकांत तीन गडी गमावून 150 धावा पूर्ण केल्या. विकेटकीपर-फलंदाज केएल राहुल 40 आणि श्रेयस अय्यर 57 धावा करून भारताकडून खेळत आहेत.
टीम इंडियाच्या मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरने न्यूझीलंडविरुद्ध सलग तिसरे अर्धशतक ठोकले. श्रेयसने 53 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले आणि 26 ओव्हरनंतर तो 54 धावा करून खेळत आहे. वनडे कारकिर्दीतील हे आठवे अर्धशतक आहे. भारताला पहिले तीन मोठे धक्के बसल्यावर श्रेयस आणि केएल राहुलने भारताचा डाव सावरला राहुल सध्या 31 धावा करून खेळत आहे. दोन्ही फलंदाज प्रत्येक षटकात एक मोठा शॉट खेळत आहे जेणेकरून विकेट गमावण्याचा दबाव कमी होऊ शकेल.
भारताचे पहिले तीन फलंदाज 70 धावा करण्यापूर्वीच पॅव्हिलिअनमध्ये परतले आहेत. अशा स्थितीत श्रेयस अय्यर आणि केएल राहुलने सावध खेळ केला. भारताने 20 ओव्हरमध्ये धावांचे शतक पूर्ण केले. दोंघांनी वेळोवेळी मोठं शॉट मार्ट मारत भारताचा स्कोर 22 ओव्हरपर्यंत 100 पार नेला. श्रेयस 35 आणि राहुल 25 धावा करून खेळत आहे. दोघांमध्ये 59 चेंडूत 50 धावांची भागीदारी झाली आहे.
नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 15 षटकांनंतर तीन गडी गमावून 77 धावा केल्या आहेत. केएल राहुल 8 आणि श्रेयस अय्यर 17 धावा करून खेळत आहेत. सुरुवातीला तीन मोठे झटके बसल्यावर राहुल आणि श्रेयस डाव सावरण्याचा प्रयत्न करत आहे.
कॉलिन डी ग्रैंडहोम ने पृथ्वी शॉ ला रन आऊट करत करून भारताला तिसरा झटका दिला. 62 धावांवर भारताने तिसरी विकेट गमावली. पृथ्वीने आजच्या डावात 42 चेंडूंचा सामना करत 3 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने 40 धावा केल्या.
हमीश बेनेटच्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर पृथ्वी शॉ ने मोठा षटकार ठोकला. बॅकफूटवर जाऊन पृथ्वीने पुल केला आणि स्कवायर लेगवर 71 मीटर लांब षटकार मारला.
न्यूझीलंडविरुद्ध टॉस गमावून पहिले फलंदाजी करत टीम इंडियाची अत्यंत खराब सुरुवात झाली. 10 ओव्हरचा खेळ संपला असून भारताने दोन विकेट गमावून 56 धावा केल्या. भारताने पहिले मयंक अग्रवाल आणि नंतर कर्णधार विराट कोहलीची विकेट गमावली. सध्या पृथ्वी शॉ 38 आणि श्रेयस अय्यर 6 धावा करून खेळत आहे. भारताच्या 50 धावाही पूर्ण झाल्या आहेत.
न्यूझीलंडला 6.4 ओव्हरमध्ये मोठे यश मिळाले. कायल जैमीसनकडे हाशिम बेनेटने भारताचा कर्णधार विराट कोहलीला झेलबाद केले. 12 चेंडूत 1 षटकारासह 9 धावा करून विराट पॅव्हिलियनमध्ये परतला. नवीन फलंदाज श्रेयस अय्यर आला आहे.
न्यूझीलंडचा नवीन वेगवान गोलंदाज काइल जैमीसनने आपल्या पहिल्याच आणि डावाच्या दुसऱ्याच ओव्हरमध्ये भारताला पहिला झटका दिला. जैमीसन ओव्हरच्या अखेरच्या चेंडूवर सलामी फलंदाज मयंक अग्रवालला 2 धावांवर बोल्ड केले.
केदार जाधव (Kedar Jadhav) याला बाहेर करून मनीष पांडे (Manish Pandey) याचा भारताच्या प्लेयिंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे. जाधव मागील दोन्ही सामन्यात बॅट आणि बॉलने चांगला खेळ करण्यास अपयशी ठरला होता.
असा आहे भारताचा प्लेयिंग इलेव्हन
भारत: पृथ्वी शॉ, मयंक अग्रवाल, विराट कोहली (कॅप्टन), श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), मनीष पांडे, रवींद्र जडेजा, शार्दूल ठाकुर, नवदीप सैनी, युजवेंद्र चहल आणि जसप्रीत बुमराह.
माउंट मौंगानुईच्या बे ओव्हल मैदानात सामन्यापूर्वी झालेल्या टॉस दरम्यान किवी कर्णधार केन विल्यमसन याने नाणेफेक जिंकली आणि पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आजच्या सामन्यासाठी भारत-किवीच्या प्लेयिंग इलेव्हनमध्ये एक-एक बदल करण्यात आले आहे. न्यूझीलंडचा नियमित कर्णधारविल्यमसन प्लेयिंग इलेव्हनमध्ये परतलेला आहे. दुसरीकडे, केदार जाधव याला बाहेर करून मनीष पांडे याचा समावेश करण्यात आला आहे.
यजमान न्यूझीलंडचा नियमित कर्णधार केन विल्यमसन भारताविरुद्ध खेळण्यास फिट आहे. पहिले दोन्ही सामन्यांसाठी बाहेर राहिलेला केन भारतविरुद्ध खेळण्यास सज्ज आहे.
यजमान न्यूझीलंडचा नियमित कर्णधार केन विल्यमसन भारताविरुद्ध खेळण्यास फिट आहे. पहिले दोन्ही सामन्यांसाठी बाहेर राहिलेला केन भारतविरुद्ध खेळण्यास सज्ज आहे.
भारतीय संघ (Indian Team) जेव्हा न्यूझीलंड (New Zealand) विरुद्ध तिसर्या आणि अंतिम वनडे सामन्यासाठी प्रवेश करेल, तेव्हा ते 'व्हाईटवॉश' टाळण्याचा प्रयत्न करतील. नियमित कर्णधार केन विल्यमसन (Kane Williamson) याच्या दुखापतीनंतरही यजमान किवी संघाने पहिल्या दोन्ही सामन्यात विजय मिळवला आणि मालिका खिशात घातली. टी-20 मालिकेतील लज्जास्पद पराभव विसरून किवी संघाने वनडे मालिकेत प्रभावी कामगिरी बजावली. आता मालिकेतील अंतिम सामन्यात विल्यमसन पुनरागमन करू शकतो. टी-20 सामन्या दरम्यान किवी कर्णधाराला दुखापत झाली होती ज्यामुळे त्याला मालिकेतील वनडे मालिकेच्या पहिल्या दोन्ही सामन्यांना मुकावे लागले होते. दुसरीकडे, भारताने प्लेयिंग इलेव्हनमध्ये बदल करण्याची शक्यता कमी आहे. मात्र त्यांच्या सलामी जोडीला फलंदाजीत सुधार करण्याची गरज आहे.
हॅमिल्टनमध्ये खेळण्यात आलेल्या पहिला वनडे सामना न्यूझीलंडने 4 विकेटने जिंकला, यानंतर ऑकलँडमधील सामन्यात भारतीय संघाला 22 धावांनी पराभव पत्करावा लागला. आतापर्यंत मालिकेत किवीचा खेळाडू रॉस टेलरने सर्वाधिक 182 धावा केल्या आणि त्यानंतर भारतीय खेळाडू श्रेयस अय्यरने 155 धावा केल्या आहेत. गोलंदाजीत टिम साऊथी ने विकेट्स घेल्या, शार्दुल ठाकूर आणि युजवेंद्र चहलने प्रत्येकी 3-3 विकेट्ससह दुसरे स्थान मिळवले आहे. भारताकडून वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने दुखापतीनंतर पुनरागमन केले, पण तो आजचवरच्या दोन्ही मालिकांमध्ये फ्लॉप ठरला. बुमराहने मागील 5 वनडे सामन्यांमध्ये 277 च्या स्ट्राईक रेटने फक्त 1 विकेट घेतली आहे. मागील तीन सामन्यात त्याला एकही विकेट मिळाली असल्याचे त्याच्या कारकिर्दीत पहिल्यांदा झाले आहे. (सामन्याचा लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा)
दोन्ही संघ
भारत वनडे टीम: केएल राहुल (विकेटकीपर), मयंक अग्रवाल, विराट कोहली (कॅप्टन), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, शिवम दूबे, रवींद्र जडेजा, नवदीप सैनी, मोहम्मद शमी, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, पृथ्वी शॉ, कुलदीप यादव, ऋषभ पंत, शार्दुल ठाकुर.
न्यूझीलंड वनडे टीम: मार्टिन गप्टिल, हेन्री निकोल्स, रॉस टेलर, टॉम लाथम (कॅप्टन/विकेटकीपर), मार्क चैपमैन, जिमी नीशम, कॉलिन डी ग्रैंडहोम, मिशेल सॅटनर, टिम साउथी, हामिश बेनेट, ईश सोढी, टॉम ब्लंडेल, काइल जैमिसन, स्कॉट कुग्गेलैन.
You might also like