न्यूझीलंडविरुद्ध ऑकलँडच्या इडन पार्कमधील 5 सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताने गोलंदाजीनंतर फलंदाजीने दमदार खेळ करत 7 विकेटने विजय मिळवला आणि मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली. या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत भारतीय संघाला विजयासाठी 133 धावांचे लक्ष्य दिले होते. सलामी फलंदाज केएल राहुल 57 आणि श्रेयस अय्यर याने 44 धावा केल्या, तर किवींकडून टिम साऊथी याने एकमेव 2 गडी बाद केले. ईश सोढीने 1 गडी बाद केला. शिवम दुबेने 4 चेंडूंत नाबाद 8 धावा केल्या. 

केएल राहुल-श्रेयस अय्यर यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी 56 चेंडूत 55 धावांची भागीदारी झाली असून भारत 100 धावांच्या जवळ आला आहे. 

न्यूझीलंडने दिलेल्या 133 धावांच्या उत्तर देताना भारतीय संघाने पहिल्या पॉवरप्लेच्या समाप्तीनंतर दोन गडी गमावून 40 धावा केल्या आहेत. केएल राहुल 20 आणि श्रेयस अय्यर 1 धाव करून सध्या खेळत आहेत. रोहित शर्मा आठ तर कर्णधार विराट कोहली 11 धावांवर बाद झाले. 

टीम साऊथीने भारताचा कर्णधार विराट कोहलीला किपर टिम सेफर्टकडे कॅच आऊट करत टीम इंडियाला दुसरा मोठा धक्का दिला. कोहलीने आज 12 चेंडूत 1 चौकार मारत 11 धावा केल्या. 

दुसर्‍या टी -20 सामन्यात सहा चेंडूत दोन चौकारांच्या मदतीने आठ धावा करून भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा टिम साऊथीचा बळी ठरला. स्लिपमध्ये रॉस टेलरने रोहितचा झेल पकडला. 

ऑकलँडच्या ईडन पार्कमधील सामन्यात  टॉस जिंकून पहिले फलंदाजी करत किवी संघाने निर्धारित 20 ओव्हरमध्ये बाद 5 धावा 132 केल्या आणि टीम इंडियासमोर 133 धावांचे लक्ष्य ठेवले. ऑकलँडमध्ये खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताकडून रवींद्र जडेजा याने 2, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. 

अनुभवी भारतीय फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजाच्या चेंडूवर षटकार मारण्याच्या प्रयत्नात किवीचा कर्णधार केन विल्यमसनला बाऊंड्री लाइनवर युजवेंद्र चहलने झेलबाद केले.

रवींद्र जडेजाने 74 धावांवर भारताला मिळवून दिले तिसरे यश. जडेजाने किवी फलंदाज कॉलिन डी ग्रैंडहोमला कॅच आऊट केले. दुसऱ्या सामन्यातहीग्रैंडहोम स्वस्तात 3 धावा करून माघारी परतला. 

न्यूझीलंडचा सलामीवीर कॉलिन मुनरो 25 चेंडूंत 2 चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 26 धावा काढून पॅवेलियनला परतला. कर्णधार कोहलीने शिवम दुबेच्या चेंडूवर मुनरोला झेलबाद केले. 

पॉवर-प्लेच्या अखेरच्या चेंडूवर शार्दूल ठाकूरने भारताला पहिले यश मिळवून दिले. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडच्या संघाने पहिल्या विकेटच्या जोरावर पहिल्या पॉवरप्लेमध्ये 48 धावा केल्या. गप्टिल पॉवरप्लेच्या शेवटच्या चेंडूला षटकार मारण्याच्या प्रयत्नात कर्णधार विराट कोहलीने झेलबाद झाला. दुसर्‍या टी -20 सामन्यात गुप्टिलने 33 धावा केल्या. कोलिन मुनरो सध्या 13 आणि कर्णधार केन विल्यमसन 0 धावा करून खेळत आहे. 

Load More

टीम इंडियाने (India) पहिला टी -20 सामना जिंकून न्यूझीलंड दौर्‍याची चांगली सुरुवात केली आहे. न्यूझीलंडमध्ये (New Zealand)आजवर खेळलेल्या सहा टी-20 सामन्यांपैकी टीम इंडियाचा हा दुसरा विजय होता. टीम इंडियाने दोन्ही सामने ऑकलँडच्या (Auckland) इडन पार्क (Eden Park) मैदानावर जिंकले आहेत. आता पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेचा दुसरा सामनाही रविवारीऑकलँडमध्ये खेळला जाणार आहे. भारतीय कर्णधार विराट कोहली दुसरा सामना जिंकून मालिका जिंकण्याच्या जवळ जायचा प्रयत्न करेल, तर किवी संघऑकलँडमध्ये भारताचा अजिंक्य रेकॉर्ड मोडू पाहिलं. पहिल्या सामन्यात एक ओव्हर शिल्लक असताना न्यूझीलंडने दिलेल्या 204 धावांचे लक्ष्य गाठल्यानंतर टीम इंडियाचा आत्मविश्वास उंचावला असेल. मात्र, ऑकलँडमधील दुसऱ्या सामन्यात यजमान संघपलटवार करून भारतविरुद्ध या मैदानावर पहिला विजय मिळवू इच्छित असेल. (मॅचचा लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा)

पहिल्या सामन्यात मिळालेल्या विजयामुळे टीम इंडिया उत्साहित असेल, पण तरीही संघासमोर अशी अनेक आव्हानं आहेत जी त्यांना पार करावी लागतील. यात सर्वात महत्वाचा गोलंदाजी विभाग आहे. पहिल्या सामन्यात शार्दुल ठाकूरने प्रति ओव्हर 14.67 च्या आणि मोहम्मद शमीने प्रति ओव्हर 13.25 च्या रेटने धावा लुटवल्या. या सामन्यात शमीला एकी विकेट मिळाली नाही. पहिल्या सामन्यात केएल राहुलने 56, श्रेयस अय्यरने नाबाद 58 आणि कर्णधार विराट कोहलीने 45 धावा केल्या. मात्र, रोहित शर्माचा फॉर्म संघासाठी चिंतेचा विषय आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या वनडेमध्ये शतकी खेळी करणारा 'हिटमॅन' किवींविरुद्ध पहिल्या सामन्यात अपयशी ठरली. त्यामुळे, या सामन्यात तो जोरदार पुनरागमन करू पाहिलं. आज, प्रजासत्ताक दिवसानिमित्त भारताला 2017 नंतर पहिल्यांदा सामना जिंकण्याची संधी आहे.

असा आहे भारत न्यूझीलंड संघ

भारत: विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, केएल राहुल, मनीष पांडे, रिषभ पंत, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्रा सिंह चहल, मुहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकुर, नवदीप सैनी आणि वॉशिंग्टन सुंदर.

न्यूझीलंड: केन विल्यमसन (कॅप्टन), मार्टिन गप्टिल, रॉस टेलर, स्कॉट कुग्गेलैन, कॉलिन मुनरो, कॉलिन डी ग्रैंडहोम, टॉम ब्रूस, डेरिल मिशेल, मिशेल सेंटनर, टिम सेफर्ट (विकेटकीपर), हमीश बेनेट, ईश सोधी, टिम साउथी, ब्लेअर टिकनर.