न्यूझीलंडविरुद्ध ऑकलँडच्या इडन पार्कमधील पहिल्या टी-20 सामन्यात भारताने यजमान किवी संघाचा 6 विकेटने पराभव केला. या सामन्यात न्यूझीलंडच्या संघाने भारतासमोर विजयासाठी 204 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत भारताने 4 विकेट्स गमावून लक्ष्य गाठले. टीम इंडियाकडून केएल राहुल याने 56 आणि कर्णधार विराट कोहली याने 45 धावा केल्या. भारतडकून श्रेयस अय्यर आणि मनीष पांडे नाबाद परतले. श्रेयसने 29 चेंडूत 58 , तर मनीषने 14 धावा केल्या.
IND vs NZ 1st T20I Highlights: टीम इंडियाने राखला ऑकलँडचा गड, न्यूझीलंडविरुद्ध 6 विकेटने मिळवला विजय
भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेचा पहिला सामना आज ऑकलंडच्या ईडन पार्क (Eden Park) मैदानावर थोड्याच वेळात सुरु होईल. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) मालिकेचा पहिला सामना जिंकून किवी संघावर सुरुवातीपासूनच दडपणाखाली आणण्याचा प्रयत्न करेल, तर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन (Kane Williamson) ही विजयासह मालिकेची सुरुवात करू इच्छित असेल. जानेवारीतच भारतीय संघाने श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका जिंकली असल्याने त्यांचा आत्मविश्वास उंचावला असेल. दुसरीकडे न्यूझीलंडला घरी खेळण्याचा फायदा मिळेल. कीवी संघ घरच्या मैदानावर खेळताना अत्यंत मजबूत आहे. अशा परिस्थितीत भारतीय संघ (Indian Team) आणि त्यांच्यात कठोर स्पर्धा पाहायला मिळेल. (मॅचचा लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा)
मालिकेत दोन्ही संघ एकमेकांना कठोर स्पर्धा देताना दिसतील. भारतीय संघ किवी दौऱ्यावर टी-20, वनडे आणि कसोटी असं तिन्ही मालिका खेळणार आहे. आजपासून सुरु होणाऱ्या या दौऱ्यात भारताच्या प्लेयिंग इलेव्हनमध्ये काही बदल पाहायला मिळतील. शिखर धवनला दुखापतीमुळे मालिकेला मुकावे लागले आहे, त्यामुळे केएल राहुल रोहित शर्मासह डावाची सुरुवात करेल, आणि तोच विकेटकिपिंगचीही जबाबदारी सांभाळेल असे कर्णधार विराटने स्पष्ट केले. तर मधल्या फळीत मनीष पांडे किंवा रिषभ पंतपैकी एकाला फलंदाज म्हणून स्थान मिळू शकते. दुसरीकडे, न्यूझीलंडचा आत्मविश्वास थोडा कमकुवत दिलेत आहे. नुकतंच ऑस्ट्रेलियाने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत त्यांचा क्लीन स्वीप केला होता. सध्याच्या मालिकेतही संघासमोर अडचणी कमी नाहीत. ट्रेंट बोल्ट, लॉकी फर्ग्यूसन, मॅट हेन्री आणि जिमी नीशम यांना दुखापतीमुळे बाहेर करण्यात आले आहे. मात्र, कर्णधार केन विल्यमसन या मालिकेतून पुनरागमन करीत आहे, जो संघासाठी दिलासादायक बाब आहे.
असा आहे भारत न्यूझीलंड संघ
भारत: विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, केएल राहुल, मनीष पांडे, रिषभ पंत, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्रा सिंह चहल, मुहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकुर, नवदीप सैनी आणि वॉशिंग्टन सुंदर.
न्यूझीलंड: केन विल्यमसन (कॅप्टन), मार्टिन गप्टिल, रॉस टेलर, स्कॉट कुग्गेलैन, कॉलिन मुनरो, कॉलिन डी ग्रैंडहोम, टॉम ब्रूस, डेरिल मिशेल, मिशेल सेंटनर, टिम सेफर्ट (विकेटकीपर), हमीश बेनेट, ईश सोधी, टिम साउथी आणि ब्लेअर टिकनर.