ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेतील तिसऱ्या वनडे सामन्यात टीम इंडियाने 7 विकेटने विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 287 लक्ष्याच्या प्रत्युत्तरात भारतीय संघाने सलामी फलंदाज रोहित शर्मा याचे शतक आणि कर्णधार विराट कोहली याच्या 89 धावांच्या खेळीच्या मदतीने विजयाची नोंद केली. बेंगळुरूमधील सामन्यात रोहितने सर्वाधिक 119, तर विराट धावा करून नाबाद परतला. मनीष पांडे आणि श्रेयस अय्यर अय्यरने अनुक्रमे नाबाद 8 आणि 44 धावा केल्या. केएल राहुलने 27 चेंडूत 19 धावांचे योगदान दिले. 

ऑस्ट्रेलियाने दिलेले 287 धावांच्या लक्ष्यासमोर यजमान संघाने 42 षटकांच्या अखेरीस दोन गडी गमावून 235 धावा केल्या आहेत. कर्णधार विराट कोहली 76 आणि श्रेयस अय्यर 13 धावा करुन खेळत आहेत. विजयासाठी अद्याप संघाला 49 चेंडूत 52 धावांची गरज आहे.

अ‍ॅडम झांपाने भारताला दुसरा झटका दिला. फलंदाज रोहित शर्मा तुफान शतकी खेळ केल्यावर मिशेल स्टार्ककडे झांपाच्या चेंडूवर कॅच आऊट झाला. रोहितने आज 127 चेंडूंचा सामना करत 8 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 119 धावा केल्या. 

भारतीय कर्णधार विराट कोहलीने आपल्या वनडे कारकिर्दीतील 57 वे अर्धशतक पूर्ण केले आहे. कोहली सध्या 61 चेंडूत चार चौकारांच्या मदतीने 52 धावा करून खेळत आहे.

टीम इंडियाचा सलामी फलंदाज आणि उपकर्णधार रोहित शर्मा ने ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या वनडे सामन्यात 110 चेंडूत शतक पूर्ण केले. रोहितचे वनडेमधील 29 वे तर, ऑस्ट्रेलियाविरुद्ध हे 8 वे शतक आहे. रोहितने आज शतकी खेळी दरम्यान 8 चौकार आणि 5 षटकार मारले. या शतकासह रोहितने कर्णधार विराट कोहलीची बरोबरी केली. विराट आणि रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकूण आठ शतकं केली आहे. 

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 287 धावांच्या प्रत्युत्तरात भारतीय संघाने 20.3 ओव्हरमध्ये 100 धावा पूर्ण केल्या. रोहित शर्मा 69, तर विराट कोहली 12 धावा करून खेळत आहे. दोघांनी 45 चेंडूत 27 धावा केल्या आहेत. 

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 287 धावांच्या प्रत्युत्तरात फलांजी करत रोहित शर्माने 44 वे वनडे अर्धशतक पूर्ण केले. रोहितने 56 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केले. 

अ‍ॅश्टन अगरने भारताला 13 व्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर पहिला धक्का दिला. अगरने टीम इंडियाचा सलामी फलंदाज केएल राहुलला एलबीडब्ल्यू आऊट केले आणि संघाला 69 धावांवर पहिला धक्का दिला. राहुलने आज 27 चेंडूंचा सामना करत 2 चौकाराच्या मदतीने 19 धावा केल्या. 

ऑस्ट्रेलियाने दिलेले 287 धावांच्या उद्घाटनाला उत्तर देताना भारतीय संघाने 8.1षटकांत कोणतेही नुकसान न करता 52 धावा केल्या आहेत. रोहित शर्मा 36 आणि लोकेश राहुल 10 धावा करून खेळत आहेत.

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 287 धावांच्या प्रत्युत्तरात भारताची सुरुवात चांगली झाली आहे. 6 ओव्हरमध्ये भारताने एकही विकेट न गमावता 39 धावा केल्या आहेत. रोहित शर्मा 25 आणि केएल राहुल 8 धावांवर खेळत आहे. 

Load More

भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) मधील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना रविवारी बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर (M Chinnaswamy Stadium) थोड्याच वेळात सुरु होईल. पहिल्या सामन्यात लाजीरवाण्या पराभवानंतर टीम इंडियाने राजकोटमध्ये खेळल्या गेलेल्या दुसर्‍या वनडे सामन्यात जोरदार पुनरागमन केले आणि मालिका 1-1 ने बरोबरीत केली. आणि आज दोन्ही संघ मालिका जिंकण्याच्या उद्देशाने अंतिम सामन्यात दाखल होतील. या दोघांमध्ये आतापर्यंत 11 द्विपक्षीय मालिका खेळल्या गेल्या आहेत. यात टीम इंडियाने 5 सामन्यात विजय मिळवला आहे, तर 6 मध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे. भारत-ऑस्ट्रेलियाने अखेरची मालिका मार्च 2019 मध्ये खेळली होती, ज्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर 3-2 ने विजय मिळवला होता. या मालिकेतील पहिला सामना मुंबईत खेळला गेला होता ज्यात ऑस्ट्रेलियाने 10 विकेट्सने विक्रमी विजय मिळवला होता. राजकोट येथे खेळल्या गेलेल्या दुसर्‍या वनडे सामन्यात भारतीय संघाने बाजी मारली आणि ऑस्ट्रेलियाला 36 धावांनी पराभूत करून मालिकेत बरोबरी साधली. (मॅचचा लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा)

निर्णायक सामन्याआधी भारतीय संघासाठी चिंतेची बाब म्हणजे टीमचे सलामी फलंदाज शिखर धवन आणि रोहित शर्मा यांना मागील सामन्यात झालेली दुखापत. टीम इंडियाचे दोन्ही सलामी फलंदाज आजचा सामना खेळणार कि नाही यावर टॉस दरम्यान कळेल. अन्य ठिकाणी कोणताही बदल संभवत नाही. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाच्या प्लेयिंग इलेव्हनमधेही मागील सामान्यापासून बदल होण्याची संभावना नाही आहे. त्यांची सलामी फलंदाज डेविड वॉर्नर आणि कर्णधार आरोन फिंच चांगल्या फॉर्ममध्ये आहे, स्टिव्ह स्मिथ आणि डेब्यू डाव खेळणारा मार्नस लाबूशेन यांनी प्रभावी डाव खेळला होता आणि भारतीय गोलंदाजांसमोर आव्हान निर्माण केले होते. मात्र, गोलंदाजांना पुढाकार घेत नियमितपणे विकेट काढणे आवश्यक आहे.

असा आहे भारत-ऑस्ट्रेलिया वनडे संघ

भारत: विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत (विकेटकीपर), केदार जाधव, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, नवदीप सैनी, आणि युजवेंद्र चहल.

ऑस्ट्रेलिया: आरोन फिंच (कॅप्टन), डेविड वॉर्नर, स्टिव्ह स्मिथ, मार्नस लाबूशेन, अ‍ॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), डार्सी शॉर्ट, अ‍ॅश्टन टर्नर, जोश हेजलवुड, पॅट कमिन्स, मिशेल स्टार्क, केन रिचर्डसन, अ‍ॅडम झँपा, अ‍ॅस्टन अगार, पीटर हैंडस्कोम्ब.