Close
Advertisement
 
शुक्रवार, डिसेंबर 27, 2024
ताज्या बातम्या
1 hour ago

IND vs NZ 2nd Test Day 2 Highlights: दुसर्‍या डावात भारताने 90 धावांवर 6 गमावल्या विकेट, दिवसाखेर न्यूझीलंडने केले जोरदार कमबॅक

क्रिकेट Priyanka Vartak | Mar 01, 2020 11:37 AM IST
A+
A-
01 Mar, 11:37 (IST)

भारत आणि न्यूझीलंडमधील दुसऱ्या सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला असून भारताने 6 विकेट गमावून 90 धावा केल्या आहेत. दुसऱ्या डावात फलंदाजी करत भारताने न्यूझीलंडवर 97 धावांची आघाडी घेतली. न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्ट ने 3 विकेट घेतल्या. टिम साऊथी, कॉलिन डी ग्रैंडहोम आणि नील वॅग्नर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. भारताकडून हनुमा विहारी 5 आणि रिषभ पंत 1 धावा करून खेळत आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच भारतीय गोलंदाजांनी जबरदस्त गोलंदाजी केली आणि किवी फलंदाजांना क्रीजवर टिकू दिले नाही. 

01 Mar, 11:30 (IST)

ट्रेंट बोल्टने भारताला दुसऱ्या डावात बॅकफूट वर टाकले. बोल्टने 89 च्या एकूण धावसंख्येवर उमेश यादवला बोल्ड केले. उमेशने 12 चेंडूंचा सामना केला आणि 1 धाव केली.

01 Mar, 11:19 (IST)

ट्रेंट बोल्टने भारताला पाचवा झटका दिला. बोल्टने चेतेश्वर पुजाराला 24 धावांवर बोल्ड केले. दुसऱ्या डावात भारताचा अर्धा संघ 80 धावांवर माघारी परतला. 

01 Mar, 11:14 (IST)

सतत संघर्ष करत करणाऱ्या अजिंक्य रहाणेला नील वॅगनर 9 धावा करून बोल्ड केले. भारताने 72 च्या स्कोरवर वसुतही विकेट गमावली आणि न्यूझीलंडवर 84 धावांची आघाडी घेतली. 

01 Mar, 10:23 (IST)

भारतीय कर्णधार विराट कोहली पुन्हा एकदा अपयशी ठरला. किवी मैदानावरील कसोटी मालिकेच्या तिसर्‍या सामन्यातही कोहलीच्या फलंदाजीने काही विशेष कामगिरी करू शकला नाही. कोहलीला कॉलिन डी ग्रैंडहोमने 14 धावांवर एलबीडब्ल्यू आऊट केले.

01 Mar, 09:31 (IST)

भारताच्या दुसऱ्या डावाची सुरुवात झाली आहे. किवी गोलंदाजांनी भारताच्या दोन्ही सलामी फलंदाजांना माघारी धाडले. भारताने 27 धावांवर पृथ्वी शॉ च्या रूपात दुसरी विकेट गमावली. पहिल्या डावात अर्धशतक करणारा पृथ्वी दुसऱ्या डावात 14 धावाच करू शकला. त्याला टिम साऊथीने बोल्ड केले. 

01 Mar, 09:00 (IST)

न्यूझीलंडला पहिल्या डावात 235 धावांवर ऑलआऊट करत भारताने 7 धावांची आघाडी घेतली होती. दुसऱ्या डावात फलंदाजी करत ट्रेंट बोल्टने भारताला पहिला धक्का दिला. बोल्टने मयंक अग्रवालला एलबीडब्ल्यू आऊट केले. मयंक दुसऱ्या डावातही धावा करू शकला नाही आणि फक्त 3 च्या स्कोरवर माघारी परतला. 

01 Mar, 08:34 (IST)

न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी जोरदार कामगिरी केली आणि यजमान संघाला दुसऱ्या सत्रात 235 धावांवर ऑलआऊट केले. टॉस गमावून पहिले फलंदाजी करताना भारताचा पहिला डाव 242 धावांवर संपुष्टात आला. पहिल्या डावात न्यूझीलंडविरुद्ध मोहम्मद शमी 4, जसप्रीत बुमराह 3, रवींद्र जडेजा 2 आणि उमेश यादवने 1 गडी बाद केला. न्यूझीलंडकडून टॉम लाथम ने अर्धशतकी डाव खेळला. लाथमने सर्वाधिक 52 धावा केल्या. 

01 Mar, 08:29 (IST)

न्यूझीलंडच्या खालच्या फळीतील फलंदाजानी भारताच्या गोलंदाजांना भरपूर त्रास दिला. काईल जैमीसन आणि नील वॅग्नरमध्ये चांगली भागीदारी होत असताना शमीने त्याला जडेजाकडे कॅच आऊट केले. वाग्नरने 21 धावा केल्या. 

01 Mar, 08:06 (IST)

भारताच्या पहिल्या डावातील 242 धावांच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडच्या 200 धावा पूर्ण झाल्या आहेत. काईल जैमीसन 37 आणि नील वॅग्नर 4 धावा करून खेळत आहे. न्यूझीलंड भारताच्या अजून 37 धावा मागे आहेत. 

Load More

भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) टीममधील दोन सामन्यांच्या कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना क्राइस्टचर्च (Christchurch) मधील हेगले ओव्हल मैदानावर खेळला जात आहे. पहिल्या दिवशी टॉस जिंकून न्यूझीलंडने भारताला पहिले फलंदाजी करण्यासाठी बोलावले. नाणेफेक गमावल्यानंतर टीम इंडिया प्रथम फलंदाजीस उतरली आणि पहिल्या डावात 242 धावांवर ऑलआऊट झाली. यानंतर न्यूझीलंडने पहिल्या डावात एकही विकेट न गमावता दिवसाखेर 63 धावा केल्या आहेत. दुसऱ्या दिवशी किवी फलंदाज पहिल्या दिवशी मिळालेही आघाडी कायम ठेवून भारतावर गोलंदाजीनंतर फलंदाजीने वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न करतील. किवी सलामी जोडी टॉम ब्लंडेल, टॉम लाथम पुन्हा एकदा भारताविरुद्ध फलंदाजीसाठी उतरतील. न्यूझीलंड अजूनही भारताच्या धावसंख्येच्या 204 धावा मागे आहे. तिसऱ्या दिवशी ते हे अंतर कमी करू पाहतील.

भारताचा पहिला डाव किवी गोलंदाजांसमोर 242 धावांवर संपुष्टात आला. भारताने एकेवेळी 194 धावांवर पाच विकेट्स गमावल्या होत्या. पण ते अखेरच्या क्षणी फक्त 48 धावा अधिक करू शकले आणि 242 धावांवर ऑलआऊट झाले. टीम इंडियाकडून हनुमा विहारीने सर्वाधिक 55 धावा केल्या. चेतेश्वर पुजारा आणि पृथ्वी शॉने 54-54 धावा केल्या. याशिवाय कर्णधार विराट कोहलीने 3, मयंक अग्रवाल आणि अजिंक्य रहाणेने 7-7 धावा केल्या. न्यूझीलंडकडून काईल जैमीसनने 5 विकेट्स घेतल्या. भारताची नवीन सलामी जोडी पृथ्वी शॉ आणि मयंक अग्रवाल पुन्हा एकदा मोठा डाव खेळण्यात अपयशी ठरली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 30 धावा जोडल्या. अर्धशतक करूनही तीनही भारतीय फलंदाज मोठा डाव खेळू शकले नाही. (सामन्याचा लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा)


Show Full Article Share Now