भारत आणि यजमान न्यूझीलंडमधील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. पहिल्या दिवशी किवी टीमने भारताला 242 धावांवर ऑलआऊट केले आणि नंतर फलंदाजी करत दिवसाखेर एकही विकेट न गमावता 63 धावा केल्या. टॉम लाथम 27 आणि टॉम ब्लंडेल 29 नाबाद धावा करून खेळत आहे. न्यूझीलंडने भारताला पहिल्या डावात 242 धावांवर ऑलआऊट केले. किवी संघाकडून दुसरा कसोटी सामना खेळणाऱ्या काईल जैमीसनने 5 गडी बाद केले, तर 3 भारतीय फलंदाजांनी अर्धशतकी कामगिरी बजावली. 

टॉस गमावून पहिले फलंदाजी करणाऱ्या भारताला न्यूझीलंडने पहिल्या डावात 242 धावांवर ऑलआऊट केले.  सामन्यात फलंदाजांनी शानदार कामगिरी बजावली. भारताकडून पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा आणि हनुमा विहारी यांनी अर्धशतकी डाव खेळला. पृथ्वी आणि पुजाराने 54, विहारीने 55 धावा केल्या. न्यूझीलंडकडूनकाईल जैमीसन ने तुफान गोलंदाजी केली. त्याने टेस्ट कारकिर्दीत पहिल्यांदा 5 विकेट्स घेतल्या. ट्रेंट बोल्ट आणि टिम साऊथी यांनी प्रत्येकी  2, नील वॅग्नर ने 1 गडी बाद केला.

भारत-न्यूझीलंडमधील काईल जैमीसनने भारताला सातवा झटका दिला. त्याने 58 ओव्हरच्या दुसऱ्यावर चेंडूवर रिषभ पंतला माघारी पाठवले. पंत 12 धावा करून बोल्ड झाला. 

भारत-न्यूझीलंडमधील काईल जैमीसनने भारताला सातवा झटका दिला. त्याने 58 ओव्हरच्या दुसऱ्यावर चेंडूवर रिषभ पंतला माघारी पाठवले. पंत 12 धावा करून बोल्ड झाला. 

चहाच्या वेळेनंतर भारताने सहा विकेट गमावून 200 धावांचा टप्पा गाठला. 57 ओव्हरनंतर रिषभ पंत 12 आणि रवींद्र जडेजा 0 धावा करून खेळत आहे. 

चहाच्या वेळेनंतर भारताला सहावा धक्का बसला. काईल जैमीसनने अर्धशतक करून खेळणाऱ्या चेतेश्वर पुजाराला बीजे वॅटलिंगकडे झेलबाद केले. पुजाराने 6 चौकाराच्या मदतीने 54 धावांचा डाव खेळला. 

चहाच्या अगदी आधी हनुमा विहारी म्हणून भारताला पाचवा धक्का बसला. विहारीने 55 धावांचे शानदार डाव खेळला आणि पुजाराबरोबर 81 धावांची भागीदारी केली. लंचनंतरच्या सत्रात टीम इंडियाने वर्चस्व गाजवले. फलंदाजांनी 109 धावा केल्या. या वेळेपर्यंत भारताने 5 विकेट गमावरून धावा केल्या. चेतेश्वर पुजाराने अर्धशतक पूर्ण केले. तो सध्या 53 धावा करून खेळत आहेत. 

न्यूझीलंड आणि भारतमधील दुसऱ्या टेस्ट सामन्याच्या पहिल्या दिवशीच्या चहाची वेळ झाली आहे. या वेळेपर्यंत भारताने 5 विकेट गमावरून धावा केल्या. चेतेश्वर पुजाराने अर्धशतक पूर्ण केले. तो सध्या 53 धावा करून खेळत आहेत. हनुमा विहारी त्याला धावा करून चांगली साथ देत आहेत. लंचनंतरचे पूर्ण सत्र भारताने गाजवले. 

न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात चेतेश्वर पुजाराने 117 चेंडूंचा सामना करत 6 चौकाराच्या मदतीने टेस्ट करिअरमधील 25 वे अर्धशतक पूर्ण केले. या मालिकेतील पुजाराचे हे पहिले अर्धशतक आहे. 

पहिले फलंदाजी करत भारतीय 40 ओव्हर झाल्या आहेत. भारताने4 विकेट गमावून 144 धावा केल्या. हनुमा विहारी 10 आणि चेतेश्वर पुजारा 48 धावा करून खेळत आहे. 

Load More

भारत (India)-न्यूझीलंड (New Zealand) दोन सामन्यांच्या टेस्ट मालिकेत आमने-सामने येण्यास सज्ज आहे. दोन्ही देशांमधील दुसरा आणि निर्णायक सामना क्राइस्टचर्चमध्ये खेळला जाईल. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. न्यूझीलंडने वेलिंग्टनमध्ये झलेल्या पहिल्या सामन्यात भारताचा 10 विकेटने धुव्वा उडवला. सध्या 2 सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया 1-0 ने पिछाडीवर आहे. दुसऱ्या सामन्यात त्यांच्यावर क्लीन स्वीपची टांगती तलवार आहे. या सामन्यात पराभव म्हणजे मालिका गमावलीच पण, सलग दुसऱ्या मालिकेत भारताला क्लीन स्वीपला सामोरे जावे लागेल. अशा स्थितीत, टेस्ट रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर असलेली टीम इंडिया विजय मिळवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करेल. किवी टीमला जोरदार टक्कर देण्यासाठी भारताला सर्व विभागात अव्वल प्रदर्शन केले पाहिजे. पहिल्या सामन्यात फलंदाजांनी अत्यंत निराशाजनक कामगिरी केली होती.

भारतासमोर दुसरा सामना जिंकण्यासाठी प्लेयिंग इलेव्हनची निवड करण्याची मोठी कोंडी आहे. सलामी फलंदाज पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) चांगली सुरुवात करूनही त्याला मोठा डाव खेळात आला नाही. मधली फळीही अपयशी ठरली.  दुसरीकडे, यजमान किवी संघाला त्यांच्या गोलंदाजांकडून विशेषतः वेगवान जोडी-ट्रेंट बोल्ट आणि टिम साऊथी यांच्याकडून ज्यांनीं मागील सामन्यात 20 पैकी 14 विकेट्स घेतल्या. किवी गोलंदाजांनी दोन्ही डावात जोरदार कामगिरी करत भारताला ऑलआऊट केले. पहिले किवी गोलंदाजांनी आणि नंतर फलंदाजांनी भारतावर दबाव कायम ठेवला. आणि आता दुसऱ्या सामन्यात विजय मिळवण्याच्या हेतूने न्यूझीलंड टीम असाच खेळ करू पाहत असेल. (सामन्याचा लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा)