Photo Credit- X

Legends 90 League 2025 Teams and Players: लेजेंड्स 90 लीग (Legends 90 League) 6 फेब्रुवारी 2025 पासून रायपूर येथे सुरू होणार आहे. ज्यामध्ये शिखर धवन (Shikhar Dhawan), हरभजन सिंग (Harbhajan Singh), सुरेश रैना सारखे अनेक भारतीय दिग्गज खेळाडू खेळताना दिसतील. ही स्पर्धा 18 फेब्रुवारीपर्यंत सात संघ जेतेपदासाठी स्पर्धा करतील. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःचे नाव कमावलेले मार्टिन गुप्टिल, रॉस टेलर आणि ड्वेन ब्राव्होसारखे परदेशी खेळाडू देखील या लीगमध्ये खेळणार आहेत.

या नवीन स्पर्धेत सात संघ सहभागी होतील. ज्यामध्ये छत्तीसगड वॉरियर्स, हरियाणा ग्लॅडिएटर्स, दुबई जायंट्स, गुजरात सॅम्प आर्मी, दिल्ली रॉयल्स, बिग बॉईज आणि राजस्थान किंग्ज या संघांचा सहभाग असेल. प्रत्येक संघ एकमेकांविरुद्ध 90 चेंडूंचा म्हणजेच 15 षटकांचा सामना होईल.

लेजेंड्स 90 लीगमध्ये सहभागी होणारे संघ आणि खेळाडू

दुबई जायंट्स: शकिब अल हसन, थिसारा परेरा, केन्नर लुईस, केविन ओ'ब्रायन, ब्रेंडन टेलर, लियाम प्लंकेट, ड्वेन स्मिथ, हॅमिल्टन मसाकाड्झा, रिचर्ड लेव्ही, ल्यूक फ्लेचर, राहुल यादव, क्रिस्टोफर एम, सिड त्रिवेदी, एस. प्रसन्ना

छत्तीसगड वॉरियर्स: सिद्धार्थ कौल, शेल्डन जॅक्सन, पवन नेगी, केव्हॉन कूपर, सुरेश रैना, विशाल कुशवाह, मार्टिन गुप्टिल, अभिषेक सकुजा, अंबाती रायुडू, अमित वर्मा, गुरकीरत सिंग मान, अमित मिश्रा, ऋषी धवन, कलीम खान, उन्मुक्त चंद, मनोज सिंग, अभिमन्यू मिथुन, कॉलिन डी ग्रँडहोम

हरियाणा ग्लॅडिएटर्स: पवन सुयाल, प्रवीण गुप्ता, अबू नेचिम, अनुरीत सिंग, इम्रान खान, असेला गुणरत्ने, इशांक जग्गी, हरभजन सिंग, नागेंद्र चौधरी, रिकी क्लार्क, पीटर ट्रेगो, चाडविक वॉल्टन, मनन शर्मा

गुजरात सॅम्प आर्मी: युसूफ पठाण, मोईन अली, ओबास पिनार, सौरभ तिवारी, केसरिक विल्यम्स, जेसेल कारिया, मिगुएल कमिन्स, चंद्रपॉल हेमराज, शापूर झदरान, मोहम्मद अश्रफुल, विल्यम पर्किन्स, नवीन स्टीवर्ट, अभिषेक, चतुरंगा डी सिल्वा, मौसिफ खान.

बिग बॉईज: मॅट प्रायर, इशान मल्होत्रा, मोनू कुमार, चिराग गांधी, तमीम इक्बाल, तिलकरत्ने दिलशान, हर्शेल गिब्स, उपुल थरंगा, अब्दुर रज्जाक, शॅनन गॅब्रिएल, वरुण आरोन, नील ब्रूम, करमवीर सिंग, रॉबिन बिश्त, नमन शर्मा, कपिल राणा , विनोद चावरिया

दिल्ली रॉयल्स: शिखर धवन, लेंडल सिमन्स, धनुष्का गुणथिलका, अँजेलो परेरा, सहज लुंबा, बिपुल शर्मा, लखविंदर सिंग, राजविंदर सिंग, रायद एम्रिट, रॉस टेलर, जेरोम टेलर, सुमित नरवाल, परविंदर अवाना

राजस्थान किंग्ज: ड्वेन ब्राव्हो, अंकित राजपूत, फिल मस्टर्ड, शाहबाज नदीम, फैज फजल, शादाब जकाती, जसकरण मल्होत्रा, इम्रान ताहिर, जयकिशन कोल्सावाला, राजेश बिश्नोई, कोरी अँडरसन, पंकज राव, समीउल्ला शिनवारी, रजत सिंग, अ‍ॅशले नर्स, दौलत झदरान , मनप्रीत गोनी