KKR Vs KXIP, IPL 2020: कोलकाता नाईट राईडर्स विरुद्ध सामन्यात टॉस जिंकून किंग्ज इलेव्हन पंजाबचा प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

KKR Vs KXIP 46th IPL Match 2020: आयपीएलच्या तेराव्या हंगामातील 39व्या सामन्यात कोलकाता नाईट राईडर्सचा संघ आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ (Kolkata Knight Riders Vs Kings XI Panjab) आज एकमेकांशी भिडणार आहेत. शारजहा मैदानात हा सामना खेळला जात आहे. या सामन्यात पंजाबच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कोलकाता नाईट राईडर्स संघाचे नेतृत्व इयॉन मॉर्गन करत आहेत. तर,किंग्ज इलेव्हन संघाचे कर्णधार पद केएल राहुल संभाळत आहे. आयपीएलच्या गुणतालिकेत कोलकाताच्या संघ चौथ्या तर, पंजाबचा संघ पाचव्या क्रमांकावर आहे. यामुळे आजचा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा ठरणार आहे.

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेली आयपीएलची स्पर्धा यावर्षी भारताऐवजी युएईमध्ये खेळवला जात आहे. जर तांत्रिक अडणींनीमुळे तुम्ही टी.व्ही पाहता येत नसेल तर, चिंता करण्याची गरज नाही. आपण डिस्नी+ हॉटस्टारवर आयपीएल लाइव्ह पाहू शकतात. डिस्नी+ हॉटस्टार यावर्षी आयपीएलचा स्ट्रीमिंग पार्टनर आहे. अशा स्थितीत, डिस्नी+ हॉटस्टारवर कोलकाता नाईट राईडर्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात रंगणारा आजचा सामनादेखील पाहता येणार आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजेपासून लाईव्ह प्रक्षेपित केला जाईल. हे देखील वाचा-IPL 2020: चेन्नई सुपर किंग्ज प्ले-ऑफमधून बाहेर पडल्यानंतर साक्षी धोनी झाली भावूक; पती महेंद्र सिंह धोनी याच्यासाठी केली 'अशी' पोस्ट

कोलकाता नाइट रायडर्स:

दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक) शिवम मावी, संदीप वारियर, कुलदीप यादव, इयोन मॉर्गन (कर्णधार), पॅट कमिन्स, सुनील नरेन, निखिल नाईक, मणिमरण सिद्धार्थ, आंद्रे रसेल, लॉकी फर्ग्युसन, प्रशांत कृष्ण, शुभमन गिल , नितीश राणा, सिद्धेश लाड, कमलेश नगरकोटी, रिंकू सिंग, वरुण चक्रवर्ती, टॉम बंटन, ख्रिस ग्रीन, राहुल त्रिपाठी

किंग्ज इलेव्हन पंजाब:

लोकेश राहुल (कर्णधार,यष्टीरक्षक), हरप्रीत ब्रार, ईशान पोरेल, मनदीप सिंग, जेम्स नीशम, तजिंदर सिंग, ख्रिस जॉर्डन, करुण नायर, दीपक हूडा, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, ग्लेन मॅक्सवेल, मुजीब उर रहमान, सरफराज खान, शेल्डन कोटरेल, मयंक अग्रवाल, मोहम्मद शमी, दर्शन नलकंडे, निकोलस पूरन, ख्रिस गेल, मुरुगन अश्विन, जगदेवेश सुचित, कृष्णाप्पा गौथम, हार्दस विल्जोइन, सिमरन सिंह