Punjab Vs Rajasthan IPL Match Live Streaming: मोहालीच्या बिंद्रा स्टेडियमवर (IS Bindra Stadium ) आज राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरूद्ध किंग्स इलेव्हन पंजाबचा (Kings XI Punjab) सामना रंगणार आहे. या सामन्यामध्ये के.एल राहुल आणि क्रिस गेल या खेळाडूंना रोखण्यात राजस्थान संघाला यश मिळतयं का? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. आर अश्विनच्या नेतृत्त्वाखाली खेळत असलेल्या पंजाबने 4 सामन्यात विजय आणि 4 सामन्यात पराभावाचा सामना केला आहे. तर राजस्थान रॉयल्स संघाने मागील 7 सामन्यांपैकी केवळ 2 सामने जिंकण्यात यश मिळवलं आहे. आजचा सामना पंजाबच्या होमपीचवर होणार आहे त्यामुळे तुम्ही पंजाब संघाचे चाहते असाल तर ऑनलाईन माध्यमातूनही तुम्ही हा सामना पाहू शकाल.
कुठे पहाल ऑनलाईन स्वरूपात हा सामना?
हॉटस्टारवर तुम्ही पंजाब विरूद्ध राजस्थान हा सामना पाहू शकाल. राजस्थान रॉयल्सने टॉस जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणचा निर्णय घेतला आहे. या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहण्यासाठी येथे क्लिक करा. तर या सामन्याचा लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा. तर या सामन्याचा लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
कसा असेल संभावित संघ
पंजाब: रविचंद्रन अश्विन (कर्णधार),लोकेश राहुल, क्रिस गेल, एंड्रयू टाई, मयंक अग्रवाल, अंकित राजपूत, मुजीब उर रहमान, करुण नायर, डेविड मिलर, मोइसिस हेनरिक्स, निकोलस पूरन, वरुण चक्रवर्ती, सैम कुरेन, मोहम्मद शमी, सरफराज खान, हरडस विजोएन, अर्शदीप सिंह, दर्शन नालकंडे, प्रभसिमरन सिंह, अग्निवेश अयाची, हरप्रीत बराड़ आणि मुरुगन अश्विन.
राजस्थान: अजिंक्य रहाणे (कर्णधार), कृष्णप्पा गौतम, संजू सैमसन, श्रेयस गोपाल, आर्यमान बिड़ला, एस. मिधुन, प्रशांत चोपड़ा, स्टुअर्ट बिन्नी, राहुल त्रिपाठी, बेन स्टोक्स, स्टीव स्मिथ, जोस बटलर, जोफ्रा आर्चर, ईश सोढ़ी, धवल कुलकर्णी, महिपाल लोमरोर, जयदेव उनादकट, वरुण एरॉन, ओशेन थॉमस, शशांक सिंह, लियाम लिविंगस्टोन, शुभम रंजाने, मनन वोहरा, एश्टन टर्नर, रियान पराग.