KXIP vs RCB, IPL 2020: विराट कोहलीने सोडले केएल राहुलचे सलग दोन कॅच; निराश नेटकरी RCB कर्णधारावर भडकले (See Tweets)
विराट कोहली फनी मिम्स (Photo Credits: Twitter)

इंडियन प्रीमिअर लीगच्या (Indian Premier League) 13 व्या सीजनचा सहावा सामना किंग्स इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) दरम्यान दुबईमध्ये सुरु आहे. बेंगलोरने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पंजाबने बेंगलोरला 207 धावांचे विशाल टार्गेट दिले आहे. यात कर्णधार केएल राहुलने (KL Rahul) आपल्या आयपीएल (IPL) करिअरमधले दुसरे शतक झळकावले. राहुलने 69 बॉलमध्ये तब्बल 132 धावांचा तुफानी डाव खेळला. राहुलने बेंगलोरच्या गोलंदाजांची धुलाई केली आणि आरसीबीला विजयासाठी तगडं आव्हान दिलं. या दरम्यान आरसीबी कर्णधार विराट कोहलीची (Virat Kohli) चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. आजच्या सामन्यादरम्यान विराटने पंजाबचा कर्णधार राहुलचे सलग दोन कॅच सोडले. विराट कोहली आपल्या सर्वोत्तम फिल्डिंगसाठी ओळखला जातो. (KXIP vs RCB, IPL 2020: केएल राहुलची वादळी खेळी, कोहलीने लागोपाठ सोडले दोन कॅच; किंग्स इलेव्हन पंजाबचे RCB समोर 207 धावांचे 'विराट' लक्ष्य)

आजच्या सामन्यात राहुल 89 धावांवर असताना विराटने राहुलचा कॅच सोडला. तो झेल विराट आणि आरसीबीला चांगलाच महागात पडला. कोहलीच्या चुकीचा फायदा घेत राहुलने तुफानी शतक ठोकलं. त्याने 69 चेंडूत नाबाद 132 धावा केल्या. त्यात 14 चौकार आणि 7 षटकारांचा समावेश होता. कोहलीच्या दुर्मिळ कामगिरीमुळे नेटकरी मात्र निराश झाले आणि सोशल मीडियावर आपली भडास काढली.

पाहा सोशल मीडिया यूजर्सच्या प्रतिक्रिया:

कोहलीचे चाहते

विराट कोहली

सलग कॅचेस

नाही...

विराटची प्रतिक्रिया

भारताचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक

नाणेफेक जिंकून विराटने प्रथम गोलंदाजी निर्णय घेतला पण पंजाबचा कर्णधार राहुलने तो निर्णय़ चुकीचा ठरवून दाखवला. मयंक अग्रवाल आणि राहुलने संघाला चांगली सुरुवात करून दिली. मयंक 20 चेंडूत 26 धावा काढून बाद झाला. निकोलस पूरनदेखील मोठा फटका खेळताना 17 धावा करून माघारी परतला. तर ग्लेन मॅक्सवेलने 5 धावा केल्या. पण कर्णधार राहुल मात्र एका बाजूने खेळत राहिला आणि नाबाद परतला. राहुल आयपीएलमध्ये सर्वात मोठा डाव खेळणारा कर्णधार बनला. राहुलच्या आधी वीरेंद्र सेहवागने कर्णधार म्हणून 119 धावा केल्या होत्या. कर्णधार आणि खेळाडू म्हणून शतक करणारा राहुल तिसरा खेळाडू आहे. सेहवाग आणि डेविड वॉर्नरने त्याच्या आधी हा पराक्रम केला आहे.