KXIP vs RCB, IPL 2020: केएल राहुलची वादळी खेळी, कोहलीने लागोपाठ सोडले दोन कॅच; किंग्स इलेव्हन पंजाबचे RCB समोर 207 धावांचे 'विराट' लक्ष्य

किंग्स इलेव्हन पंजाबने निर्धारित 20 ओव्हरमध्ये कर्णधार केएल राहुलच्या दमदार शतकी खेळीच्या जोरावर बेंगलोरसमोर 207 धावांचे लक्ष्य उभे केले. पंजाबचा कर्णधार राहुलने सर्वाधिक 132 धावा केल्या आणि नाबाद परतला. राहुलने 62 चेंडूत शतक पूर्ण केले. राहुलचे आयपीएलमधूला दुसरे शतक होते. आयपीएलच्या 13व्या हंगामातील हे पहिले शतक ठरले.

KXIP vs RCB, IPL 2020: केएल राहुलची वादळी खेळी, कोहलीने लागोपाठ सोडले दोन कॅच; किंग्स इलेव्हन पंजाबचे RCB समोर 207 धावांचे 'विराट' लक्ष्य
केएल राहुल (Photo Credit: PTI)

आयपीएलच्या (IPL) 13 व्या सीजनचा सहावा सामना किंग्स इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Banglore) दरम्यान आज दुबईमध्ये खेळला जात आहे. बेंगलोरने टॉस जिंकून प्रथमक गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि पंजाबला पहिले फलंदाजीसाठी बोलबले. अशा स्थितीत पंजाबने निर्धारित 20 ओव्हरमध्ये कर्णधार केएल राहुलच्या (KL Rahul) दमदार शतकी खेळीच्या जोरावर बेंगलोरसमोर 207 धावांचे लक्ष्य उभे केले. पंजाबचा कर्णधार राहुलने सर्वाधिक 132 धावा केल्या आणि नाबाद परतला. राहुलने 62 चेंडूत शतक पूर्ण केले. राहुलचे आयपीएलमधूला दुसरे शतक होते. आयपीएलच्या 13व्या हंगामातील हे पहिले शतक ठरले.पंजाबच्या मागील सामन्यात अर्धशतक झळकावणारा मयंक अग्रवाल आज 26 धावांवर बाद झाला, निकोलस पूरनने 17 धावा केल्या. बेंगलोरच्या गोलंदाजांना आज प्रभावी कामगिरी करता आली आणि पंजाबच्या 3 फलंदाजांना माघारी धाडले. शिवम दुबेने (Shivam Dube) 2 आणि युजवेंद्र चहलने 1 विकेट घेतली. (KXIP vs RCB, IPL 2020: केएल राहुल 2000 आयपीएल धावा करणारा वेगवान भारतीय फलंदाज; सचिन तेंडुलकर, सुरेश रैना सारख्या दिग्गजांना टाकले मागे)

आजच्या सामन्यात मयंक आणि राहुलने पंजाबसाठी साजेशी सुरुवात केली. दोघांमध्ये अर्धशतकी भागीदारी झाली. मयंक आणि राहुलने पहिल्या विकेटसाठी 57 धावा जोडल्या. मयंकच्या रूपात पंजाबला पहिला झटका बसला ज्याला चहलने आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवून बोल्ड केले. यानंतर राहुलने पूरनच्या साथीने डाव पुढे नेला आणि दुसऱ्यांदा सामन्यात अर्धशतकी भागीदारी केली. पंजाबचा डाव सावरत असताना शिवमने पूरनला बाद करून मोठा धक्का दिला. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेल राहुलला जास्त काळ साथ देऊ शकला नाही आणि 5 धाव करून माघारी परतला. राहुलला आजच्या सामन्यात बेंगलोरचा कर्णधार विराटने दोनदा जीवदान दिले. परिणामाची राहुलने आयपीएलमधील दुसरे शतक ठोकले.

आजच्या सामन्यात पंजाबचा कर्णधार राहुलने आयपीएलमधील 17 वे अर्धशतक झळकावले आहे. यासोबतच राहुलने आपल्या आयपीएल करिअरमधील 2000 धावा पुर्ण केल्या आहेत. आयपीएलमध्ये 2000 धावा करणारा राहुल सर्वात वेगवान भारतीय खेळाडू ठरला. त्याने 60 व्या डावात हा पराक्रम केला आणि मुंबई इंडियन्सच्या व महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला मागे टाकले.

(The above story first appeared on LatestLY on Sep 24, 2020 09:25 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).