इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 24व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध (Kolkata Knight Riders) सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबने (Kings XI Punjab) चांगली सुरुवात केली. तिसऱ्या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर मोहम्मद शमीने सलामी फलंदाज राहुल त्रिपाठीचा त्रिफळा उडवला. राहुल बाद झाल्यावर तिसऱ्या क्रमांकावर त्यांचा स्टार फलंदाज नितीश राणा (Nitish Rana) मैदानात आला. नितीश आणि शुबमन गिल (Shubman Gill) यांच्यात चांगली भागीदारी होणार असं वाटत असतानाच दोंघाचा मैदानात प्रचंड गोंधळ उडाला ज्याचा फायदा किंग्स इलेव्हनला झाला. आधीच्या सामन्यात एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध (सीएसके) महत्त्वपूर्ण विजय नोंदविल्यानंतर दिनेश कार्तिकच्या नेतृत्वात नाईट रायडर्स अबू धाबीच्या शेख जाएद स्टेडियमवर किंग्ज इलेव्हन पंजाबशी सामना सुरु आहे. आयपीएलमध्ये (IPL) आपले आव्हान कायम ठेवण्यासाठी किंग्स इलेव्हन पंजाबला आजचा सामना जिंकणे महत्वाचे आहे. (KXIP vs KKR, IPL 2020: शुभमन गिल, दिनेश कार्तिकच्या अर्धशतकाने सावरला नाईट रायडर्सचा डाव, KXIP समोर विजयासाठी 165 धावांचे लक्ष्य)
दरम्यान, अर्शदीप सिंहच्या चौथ्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर शुबमनने चेंडू शॉर्ट फाईन लेगकडे चेंडू मारला आणि एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न केला. समोरून नितीशनेही प्रतिसाद दिला आणि धावला, पण गिलने त्वरित क्रीजमध्ये परतला, पण शुभमनचं लक्ष नसल्याने दोघे एकाच दिशेला धावले. राणाचे हे असे रनआऊट पाहून आपणही नक्की कपाळाला हात मारालं. पाहा हा व्हिडिओ:
Comedy of errors: Rana walks back
Big mix-up between Gill & Rana. Both caught in the crease at one end. Rana is run-out. KKR lose their second.
📹📹https://t.co/RnUq5W3Wmg #Dream11IPL
— IndianPremierLeague (@IPL) October 10, 2020
दुसरीकडे, आजच्या सामन्यात टॉस जिंकून केकेआरने पहिले फलंदाजी केली आणि 164 धावा केल्या. शुभमनने सर्वाधिक 57 धावा केल्या. इयन मॉर्गनने 24, कर्णधार दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) 57 धावा केल्या. कार्तिक आणि शुभमन यांच्यात चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारीने संघाचा डाव सावरला. गिलने संघाचा डाव सावरताना 42 चेंडूत पाच चौकारांच्या मदतीने स्पर्धेतले तिसरे अर्धशतक झळकावले. किंग्स इलेव्हनकडून रवी बिश्नोई, अर्शदीप सिंह आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.