KKR (Photo Credit - X)

IPL 2025: आयपीएल 2025 सुरू होण्यास फक्त काही तास शिल्लक आहेत. पहिला सामना 22 मार्च रोजी गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला जाईल. केकेआरने आगामी हंगामाची जबाबदारी अजिंक्य रहाणेकडे सोपवली आहे. केकेआर या हंगामात आपले जेतेपद राखण्याच्या उद्देशाने प्रवेश करेल. पहिल्या सामन्यात आरसीबी विरुद्ध केकेआरची काय असू शकते प्लेइंग इलेव्हन आपन जाणून घेवूया.. (हे देखील वाचा: KKR vs RCB, IPL 2025 1st Match: आयपीएलच्या आगामी हंगामात विराट कोहली करणार मोठा विक्रम, फक्त कराव्या लागणार 'इतक्या' धावा)

सलामी जोडीवर एक नजर

आरसीबीविरुद्धच्या पहिल्या सामन्यात केकेआरकडून सुनील नारायण आणि क्विंटन डी कॉक सलामी करू शकतात. गेल्या काही वर्षांपासून नरेन केकेआरसाठी सलामीवीर म्हणून उत्कृष्ट कामगिरी करत आहे, तर क्विंटन डी कॉक या वर्षीच केकेआरमध्ये सामील झाला आहे. याआधी तो लखनौ सुपर जायंट्सचा भाग होता. असे मानले जाते की दोन्ही डावखुरे फलंदाज यावर्षी केकेआरसाठी सलामीला येतील.

ही नावे मधल्या फळीत समाविष्ट 

कर्णधार अजिंक्य रहाणे स्वतः तिसऱ्या क्रमांकावर जबाबदारी घेऊ शकतो. यापूर्वी, रहाणेने सीएसकेसाठी मधल्या फळीत चमत्कार केले होते. चौथ्या क्रमांकावर, आयपीएल 2024 मध्ये भरपूर धावा करणारा वेंकटेश अय्यर फलंदाजी करताना दिसतो. केकेआरकडून खालच्या मधल्या फळीत अंगकृष रघुवंशी, रिंकू सिंग, आंद्रे रसेल आणि रमणदीप सिंग हे खेळाडू दिसू शकतात.

गोलंदाजी विभागावर एक नजर

सुनील नरेन आणि वरुण चक्रवर्ती यांना फिरकी विभागात संधी मिळू शकते. याशिवाय स्पेन्सर जॉन्सन, वैभव अरोरा, हर्षित राणा यांना वेगवान गोलंदाज म्हणून संधी मिळण्याची अपेक्षा आहे.

केकेआरची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

सुनील नारायण, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), अजिंक्य रहाणे (कर्णधार), वेंकटेश अय्यर, अंगकृष रघुवंशी, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमनदीप सिंग, स्पेन्सर जॉन्सन, वैभव अरोरा, हर्षित राणा/वरुण चक्रवर्ती