स्लो ओव्हर टाकणे कोलकाता नाईट रायडर्सच्या अंगाशी आले आहे. या संघाचा कर्णधार नितीश राणा याला तब्बल 24 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर इम्पॅक्ट सबस्टिट्यूटसह प्लेइंग इलेव्हनच्या प्रत्येक सदस्याला 6 लाख रुपये किंवा मॅच फीच्या 25% दंड ठोठावण्यात आला आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर 14 मे रोजी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध प्रीमियर लीग (IPL) दरम्यान हा सामना झाला होता. (हेही वाचा, MS Dhoni Signs Jersey For Rinku: चॅपॉकवरील शानदार परफॉर्मेंस नंतर रिंकू सिंगला धोनीकडून मिळाले स्पेशल गिफ्ट (Watch Video))
ट्विट
Kolkata Knight Riders Captain Nitish Rana has been fined Rs 24 lakh and each member of the Playing XI, including the impact substitute, fined Rs 6 lakh or 25 % of the match fee, after his team maintained a slow over-rate during their TATA Indian Premier League (IPL) match against…
— ANI (@ANI) May 15, 2023