Sunil Narin (Photo Credit - X)

Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders, 25th Match: इंडियन प्रीमियर लीग 2025 चा 25 वा सामना पाच वेळा विजेते चेन्नई सुपर किंग्ज आणि गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स (KKR vs CSK) यांच्यात एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई (MA Chidambaram Stadium, Chennai) येथे खेळवला गेला. या सामन्यात, कोलकाता नाईट रायडर्सने चेन्नई सुपर किंग्जचा 8 गडी राखून पराभव केला आहे. त्याआधी, कोलकाताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या चेन्नईने कोलकातासमोर 104 धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या कोलकाताने 10.1 षटकातच लक्ष्य गाठले.

केकेआरच्या गोलंदाजांपुढे धोनीची सेना ढेपाळली

दरम्यान, नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या चेन्नईने 20 षटकात 9 गडी गमावून 103 धावा केल्या. चेन्नईकडून शिवम दुबेने 31 धावांची सर्वाधिक खेळी केली. त्याने 29 चेंडूत 3 चौकार मारले. त्याच्याशिवाय विजय शंकरने 29 धावांचे योगदान दिले. बाकी कोणत्याही खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही. दुसरीकडे कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून गोलंदाजीत सुनील नरेन सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. तर हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्तीला प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या.

हे देखील वाचा: MS Dhoni Milestone: एमएस धोनीने इतिहास रचला, आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा ठरला पहिला खेळाडू

सुनील नरेनची 44 धावांची शानदार खेळी

त्यानंतर, लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने 10.1 षटकांत फक्त 8 गडी गमावून लक्ष्य गाठले. कोलकाता नाईट रायडर्सकडून स्टार फलंदाज सुनील नरेन 44 धावांची शानदार खेळी केली. त्याने 18 चेंडूत 2 चौकार आणि 5 षटकार मारले. त्याच्या व्यतिरिक्त, क्विंटन डी कॉकने 23 धावा केल्या. त्याच वेळी, चेन्नई सुपर किंग्जकडून अनुज कंमोज आणि नूर अहमदने प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.