CSK vs KKR (Photo Credit - X)

Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders, 25th Match: इंडियन प्रीमियर लीग 2025 चा 25 वा सामना पाच वेळा विजेते चेन्नई सुपर किंग्ज आणि गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स (KKR vs CSK) यांच्यात एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई (MA Chidambaram Stadium, Chennai) येथे खेळवला जाणार आहे. दोन्ही संघ मागील सामन्यातील पराभव विसरुन मैदानात उतरणार आहे. या हंगामात, कोलकाताचे नेतृत्व अंजिक्य राहाणे (Ajinkya Rahane) करत आहे. तर, ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे बाहेर पडल्यामुळे चेन्नई सुपर किंग्जची कमान पुन्हा एमएस धोनीच्या (MS Dhoni) खांद्यावर आहे. दरम्यान, चेन्नई संघाने पहिला सामना जिंकल्यानंतर सलग चार सामने गमावले आहेत, ज्यामुळे तो गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे. दुसरीकडे कोलकाताने 2 सामने जिंकून तीन सामने गमावले असुन ते सहाव्या स्थानावर आहे. त्यामुळे दोन्ही संघामध्ये आजचा सामना रोमांचक पाहायला मिळू शकतो.

हेड टू हेड रेकॉर्ड (CSK vs KKR Head To Head Record In IPL)

आयपीएलच्या इतिहासात चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात एकूण 30 सामने खेळले गेले आहेत. या काळात, चेन्नई सुपर किंग्जने वरचढ कामगिरी केली आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघाने 19 सामने जिंकले आहेत. तर, कोलकाता नाईट रायडर्सने फक्त 10 सामने जिंकले आहेत. एका सामन्याचा निकाल लागला नाही. या हंगामात दोन्ही संघांमधील ही पहिलीच भेट आहे. आयपीएलच्या गेल्या हंगामात दोन्ही संघांमध्ये एक सामना खेळवण्यात आला होता. या काळात चेन्नई सुपर किंग्जने विजय मिळवला होता. कोलकाता नाईट रायडर्स हा सामना जिंकून त्यांची आकडेवारी सुधारू इच्छिते.

हे देखील वाचा: CSK vs KKR, TATA IPL 2025 25th Match Key Players: चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार हाय व्होल्टेज सामना, सर्वांच्या नजरा असतील 'या' दिग्गज खेळाडूंवर

आजच्या सामन्यात होऊ शकतात 'हे' मोठे विक्रम 

चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार ऋतुराज गायकवाडला टी-20 क्रिकेटमध्ये पाच हजार धावा पूर्ण करण्यासाठी चार धावांची आवश्यकता आहे.

चेन्नई सुपर किंग्जचा स्टार फलंदाज दीपक हुड्डाला आयपीएलमध्ये 1500 धावा पूर्ण करण्यासाठी 28 धावांची आवश्यकता आहे.

चेन्नई सुपर किंग्जचा स्टार गोलंदाज मुकेश चौधरीला टी-20 क्रिकेटमध्ये 50 विकेट्स पूर्ण करण्यासाठी दोन विकेट्सची आवश्यकता आहे.

कोलकाता नाईट रायडर्सचा घातक फलंदाज वेंकटेश अय्यरला आयपीएलमध्ये 1500 धावा पूर्ण करण्यासाठी 60 धावांची आवश्यकता आहे.

कोलकाता नाईट रायडर्सचा अष्टपैलू खेळाडू सुनील नारायणला टी-20 क्रिकेटमध्ये 4,500 धावा पूर्ण करण्यासाठी 43 धावांची आवश्यकता आहे.

कोलकाता नाईट रायडर्सचा घातक फलंदाज रिंकू सिंगला आयपीएलमध्ये एक हजार धावा पूर्ण करण्यासाठी आठ धावांची आवश्यकता आहे.