KKR vs MI, IPL 2020: रोहित शर्माचा 'डबल धमाका'! कोलकाताविरुद्ध मुंबई कर्णधाराने लगावली विक्रमांची लाईन, जाणून घ्या
रोहित शर्मा (Photo Credit: Instagram)

इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 13व्या हंगामातील पाचव्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध (Kolkata Knight Riders) सामन्यात विक्रमांची लाईन लगावली. रोहितने केकेआरविरुद्ध आजच्या सामन्यात 80 धावांचा दमकेदार डाव खेळला. अबू धाबी येथील शेख झाएद स्टेडियमवर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहितने कोलकाताच्या गोलंदाजांची क्लास घेतली. त्याने आयपीएल कारकिर्दीतील 37 वे अर्धशतक झळकावले. रोहितने 54 चेंडूंत 3 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 80 धावांचे तुफानी डाव खेळला. केकेआरविरुद्ध (KKR) आजच्या या डावात रोहितने अनेक खास विक्रम आपल्या नावावर केले आहेत. रोहितने आयपीएल कारकीर्दीतले शतकारांचे (Rohit Sharma IPL Sixes) दुहेरी शतक पूर्ण केले. या सामन्यात रोहितचा सहावा षटकार त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील 200 वा षटकार होता. रोहित आयपीएलच्या (IPL) इतिहासात षटकारांसह दुहेरी शतक झळकावणारा भारताचा दुसरा खेळाडू ठरला आहे. (KKR vs MI, IPL 2020: हिटमॅन Reloaded! रोहित शर्माची फटकेबाजी, मुंबई इंडियन्सने कोलकातासमोर 196 धावांचे विशाल आव्हान)

रोहितशिवाय भारतीय खेळाडूंपैकी फक्त एसएस धोनीने हा पराक्रम केला आहे. शिवाय, 'युनिव्हर्स बॉस' क्रिस गेल 326 षटकारांसह या यादीत आघाडीवर आहे. याशिवाय कोणत्याही एका संघाविरूद्ध सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत त्याने सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नरला मागे टाकले आहे. वॉर्नरचा हा विक्रम देखील कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध आहे. रोहितने कोलकाताविरुद्ध (हा लेख लेखेपर्यंत) 875 धावा केल्या आहेत, तर वॉर्नरने कोलकाताविरुद्ध 829 धावा केल्या होत्या. याशिवाय कोहलीने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 825 धावा केल्या आहेत.

रोहितने कोलकाताविरुद्ध अर्धशतक ठोकले, आयपीएलमधील हे त्याचे 38 वे अर्धशतक आहे. असे करत त्याने एबी डिव्हिलियर्सला पराभूत केले. रोहितच्या पुढे सुरेश रैना, विराट कोहली आणि डेविड वॉर्नर आहेत. वॉर्नरने आयपीएलमध्ये सर्वाधिक 48 अर्धशतकं केली आहेत. दुसरीकडे, रोहितऐवजी कीरोन पोलार्डसाठी देखील आजचा सामना विक्रमी ठरला. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून 150 सामने खेळणारा पोलार्ड पहिला खेळाडू ठरला. कोलकाताविरुद्ध आजचा सामना पोलार्डचा 150 वा सामना आहे. या पराक्रमासाठी मुंबई इंडियन्सकडून पोलार्डला 150 क्रमांकाची जर्सी भेट देण्यात आली. आयपीएल इतिहासात एकाच संघाकडून 150 सामने खेळणारा पोलार्ड चौथा खेळाडू ठरला आहे. पोलार्डने 2010 रोजी मुंबई संघाकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते.